-->

शासनाने प्रतिबंधीत केलेले कपाशी बियाणे एलसीबीची ने केले जप्त LCB seized cotton seeds banned by the government

0





शासनाने प्रतिबंधीत केलेले कपाशी बियाणे एलसीबीची ने केले जप्त LCB seized cotton seeds banned by the government



इतर साहित्य असा एकुण ८,१५,०००/- रुपयाचा मुद्देमाल पो.स्टे. वडकी हद्दीतुन तर पो.स्टे. शिरपुर हद्दीतुन १८,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन चौघां विरुध्द केली कारवाई LCB seized cotton seeds banned by the government 

शासनाने प्रतिबंधीत केलेले कपाशी बियाणे एलसीबीची ने केले जप्त


सध्या शेतकऱ्यांचा हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. यातच बोगस बियाणे तस्करी करणारे रॅकेट सक्रीय झाले आहे. ही कुणकुण लागताच वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

दिनांक २९/०५/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक उघड गुन्हे उघडकीस आणने व पाहिजे फरार आरोपीतांचा शोध घेणे संबंधाने पो.स्टे. वडकी हद्दीत पेट्रोलीग करीत असतांना गोपणीय बातमीदारकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, इसम नामे १) विलास नानाजी देवेवार २) अविनाश संतोषराव निकम दोन्ही रा. सावित्री पिंपरी, वडकी, हे दोघे कोठारी ता. बल्लारशा जि. चंद्रपुर येथुन भारत सरकारने प्रतिबंधीत केलेले अनाधिकृत कपाशी बियाने विक्री करीता ताब्यात बाळगुण असून ते स्वतःचे फायदया करीता एका सुझुकी ब्रेझा कार मध्ये वडकी येथे विक्री करीता घेवून येणार आहेत. अशी माहिती मिळाल्याने पथकाने त्याबाबत वरिष्ठांना अवगत करुन त्यांचे मार्गदर्शनानुसार कृषी विभागाचे अधिकारी व त्यांचे पथकास सोबत घेवुन माहिती प्रमाणे खैरी बसस्थानक येथे सापळा लावून थांबले असतांना माहिती प्रमाणे सुझुकी ब्रेझा वाहन क्र. एम.एच.४१ ए ई- ६१९६ हे खेरी बसस्थानकाकडे येतांना दिसताच पथकाने त्यास थांबवुन वाहनातील दोन इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) विलास नानाजी देवेवार वय ४० वर्षे, २) अविनाश संतोषराव निकम वय २९ दोन्ही रा. सावित्री पिंपरी, असे असल्याचे सांगीतल्याने त्यांचे वाहनाची झडती सोबत असलेले कृषी अधिकारी यांनी घेतली असता वाहनाचे मागील सिट समोरील मोकळ्या जागेत एका प्लास्टीक पोत्यात अंदाजे ३३ किलो खुले कपाशी बियाने किमंत अंद १,०५,००० रु चे आढळून आल्याने त्यांना सदरचे बियाने कोठुन आणले याबाबत विचारपूस केली असता त्यांनी ते बियाने ३) सागर अरुन पारलेवार रा. कोठारी ता. बल्लारशा जि. चंद्रपुर यांचेकडून विक्री करीता आणले असल्याचे सांगीतले आहे. नमुद इसमांकडे अनाधिकृत कपाशी वियाने विक्री करीता बाळगून असलेले मिळून आल्याने सदरचे बियाने व नमुद इसमांचे ताब्यात असलेले वाहन तसेच त्याचे कडील मोबाईल फोन असा एकुण ८,१५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे. वणी येथे तिनही इसमाविरुध्द कारवाई नोंद केली आहे.


त्याच प्रमाणे दिनांक २७/०५/२०२४ रोजी पो.स्टे. शिरपुर हद्दीत कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेवुन केलेल्या कारवाई मध्ये आरोपी अमोल विजय चिकनकर वय ३३ वर्षे, रा. वार्ड नं. ०२ भालर ता. वणी जि. यवतमाळ ह.मु. पिंपरी कायर ता. वणी याचे कब्जातून बलवान रिसर्च यांत्रड कॉटन सिड ५ जी या अनाधिकृत कपाशी बियान्याचे १५ पाकीटे किमंत १८,००० रुचे जप्त करुन पो.स्टे. शिरपुर येथे त्याचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्वागुशा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी सर्व स्वागुशा यवतमाळ तसेच राजेंद्र माळोदे, . अमोल जोशी,प्रविण जाधव, कल्याण पाटील सर्व कृषी विभाग यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top