-->

यवतमाळ मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ ट्रॅव्हलर चा भीषण अपघात.Fatal accident of traveler near Nimbala Phata on Yavatmal Marg.

0


यवतमाळ मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ ट्रॅव्हलर चा भीषण अपघात.Fatal accident of traveler near Nimbala Phata on Yavatmal Marg.




Sangini News

वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निंबाळा फाट्याजवळ ट्रॅव्हलर खाईत कोसळून भीषण अपघात झाला आहे. तूर्तास यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
यवतमाळ मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ ट्रॅव्हलर चा भीषण अपघात.


सुदैवाने जीवितहानी नाही

वणी येथील ढवळे कुटुंबातील १६ ते १७ लोक देवदर्शनासाठी निघाले होते. दरम्यान शनिवारी दुपारी साडेतीन वाजताचे सुमारास निंबाळा फाट्याजवळ ट्रॅव्हलर अचानक २० ते २५ फूट अंतरावर खाली कोसळली. यातील जवळपास सर्वच लोकांना वणीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. निंबाळा गावाजवळ अपघाताची मालिका सुरूच असते. सदर अपघात कसा झाला आहे हे अद्याप अस्पष्ट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top