रॉकवेल च्या विरोधात ग्रामवासी रस्त्यावर
Sangini News
यवतमाळ जिल्ह्यातील वणी पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भालर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेपासून सातशे मीटर अंतरावर असलेल्या जागेवर प्रशासनाने ऐन आचार संहिता काळात परवानगी ग्रामस्थांना विश्वासात न घेता चिरीमिर घेत दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. भविष्यात मोठं जण आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.Villagers on the street against Rockwell
वणी तालुक्यातील भालर येथे आधीच रॉकवेल कंपनी कार्यरत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आचार असल्याचा फायदा घेत एक वकील अन,प्रशासकीय अधिकारी, यांनी संगनमत करीत भालर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेपासून अवघ्या सातशे मीटर अंतरावर नवीन कंपनी हार्मोनि मिनरल स्थापन करण्यासाठी जणू बळच पुरविले.
सध्या ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.अशातच ग्रामस्थ अन लहान लेकरं यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावातील तलावाची स्थिती,प्रदूषण, लेकरांचे भविष्य यात पुरता गाव अडकला आहे. लोकांचा नेता गप घेऊन भालर ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आणतांना दिसतो आहे. अनपेक्षित एक अधिकारी सुद्धा यावर बोलून गेले. समक्ष सर्वांच्या, ऐन आचार संहिता काळात दबाव?
सध्याच्या घडीला भालर ग्रामस्थ आक्रमक पवित्र्यात दिसते आहे. लगेच प्रशासनाने आचार संहिता काळात रॉकवेल (हार्मोनि मिनरल)ला दिलेली परवानगी, अन पत्रव्यवहार थांबवला नाही तर, मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आम्ही रस्त्यावर उतरू
ऐन आचार संहिता सुरू असतानाच, आमच्या गावाचा प्रश्न प्रशासकीय अधिकारी, आणि लोकप्रतिनिधी यांनी मार्गी लावला , तरी मी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना घेऊन लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या विरुद्ध लढा तीव्र करणार!
देवेंद्र पारखी(उपसरपंच)
सदस्य ग्रामपंचायत भालर अन ग्रामस्थ

