पपई खाण्याचे लाभकारी फायदे जाणून होणार थक्क !You will be amazed to know the beneficial benefits of eating papaya
sangini news
जवळपास आपण सर्वच जण आपल्या घरात पपई आणतो. परंतु आपल्याला पपई खाण्याचे फायदे पूर्णतः माहिती नाही .मागील काळात डेंग्यू चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले होते. कोणत्याही औषधीने शरीरातील पेशींची वाढ होत नव्हती . तसेच अनेक आजारांवर पपई किती फायद्याची आहे हेच येथे जाणून घेऊयात . या साठीच आम्ही आपणास पपई खाण्याचे विविध फायदे येथे सांगणार आहोत. तर चला बघूया पपई ,त्यातून निघणारे दूध, पपईच्या पानांचा रस आदी कोणकोणत्या आजारावर फायदेशीर राहील. मित्रांनो जर आमच्या sangini news चॅनेल ला फालो केले नसेल तर नवनवीन बातम्या बघण्यासाठी कृपया फालो करा.
सर्वप्रथम पपईच्या पानाचे फायदे जाणून घेऊया You will be amazed to know the beneficial benefits of eating papaya
पपईच्या पानांचा रस हा जीर्ण ताप असलेल्या व्यक्तीला दिला तर तापत कमी झालेल्या पेशींची झपाट्याने वाढ होऊन रुग्णाला शक्ती प्रदान करण्यास मदत करते . कोणत्याही तापात आजारी व्यक्तीला पपईच्या पानांचा रस,किंवा काढा दिल्यास एक दोन दिवसात रुग्ण ठणठणीत होतोच. त्यासाठी पपईचे तीन पाने घेऊन त्याचा रस किंवा काढा रुग्णाला दिल्यास रक्तातील पेशींची झपाट्याने वाढ होते. म्हणूनच पपईला फळाचा राजा नाहीतर महाराजा म्हणायला हरकत नाही .
पपईच्या दुधाचे फायदे
जर कोणाला खाजेचा त्रास असेल \, दात दुखी, दाढ दुखणे , हिरड्या सुजणे आदी त्रास असेल तर कच्ची पपई घेऊन त्याचे दूध खाज असेल त्या जागी लावल्यास त्वरित आराम मिळतो. जर आपले दात दुखत असेल, हिरड्यांचे सुजन आली असेल तर हाताच्या बोटावर पपईचे दूध घेऊन हिरड्यांचे दातांना हळूहळू मळाल्यास दातदुखी पासून त्वरित आराम मिळतो.
पचनशक्ती वाढविण्यासाठी पपई
जर कोणाला पोटात गॅस तयार होत असेल, वारंवार ढेकर येणे, बद्धकोष्ठता, हृदयाची समस्या अशा व्याधीने ग्रस्त झाले असल्यास, यकृत नीट कार्य करीत नसेल,liver सोबतच मूळव्याधीचा त्रास उद्भवत असल्यास पिकलेली पपई घेऊन तीचे तुकडे करायचे व त्या तुकड्यावर काळी मिरे ,काळ मीठ एक पावडर टाकून खाल्ले तर अपचन ,पोटात गॅस, अजीर्ण, ऍसिडिटी सारखे त्रास चुटकीसरशी गायब होईल आणि लिव्हर स्वच्छ होण्यास मदत होईल. एकदा करून बघा हा उपाय नक्कीच फायदा होईल. सोबतच ज्यांचे कोलेस्टोल वाढून चरबी जमा होत असेल त्यांना पप्पाची सेवन केल्याने नक्कीच फायदा होईल
सौंदर्यासाठी पपई लाभदायक
ज्या व्यक्सतींना चेहऱ्यावर पुरळ,मुरुमाचे डाग,रुम असेल चेहरा उजळ दिसत नसेल त्यांनी पपईचा तुकडा घेऊन चेहऱ्यावर मसाज केला तर अगदी काही दिवसातच चेहऱ्यावरील डाग,मुरूम,पुरळ जाऊन चेहरा नितळ दिसायला लागेल. ज्यांना डोळ्यांचा त्रास असेल त्यांनी पपईचे सेवन अवश्य करायला हवे, त्याच बरोबर महिलांच्या मासिक पाळीत होणार असह्य त्रास पपई सेवन केल्याने कमी होईल. पूर्वी बाळंत झालेल्या महिलांना पपईची भाजी खाऊ घालायचे याचे कारण म्हणजे बाळंत महिलेला ऊर्जा मिळावी, ती तंदुरुस्त राहावी, बाळ निरोगी राहावे यासाठीच पूर्वीचे लोक हे घरगुती उपाय आवर्जून करायचे.
. तर मित्रानो असे नवनवीन घरगुती उपाय वाचण्यासाठी संगिनी न्यूज चॅनेल ला फालो करा धन्यवाद.

.jpg)
