-->

क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

0

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा चिखलगाव , क्रांतीसुर्य बिरसा मुंडा विचार युवा मंच चिखलगाव  , यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रविवार रोजी 9 जून , क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या 124 वा स्मृती दिनानिमित्त, 10 व्या वर्गात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्याचा सत्कार तसेच   गुणगौरव सोहळा , चिखलगाव येथे , क्रांतिवीर बिरसा मुंडा सामाजिक सांस्कृतिक भवन येथे घेण्यात आला . या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद , प्रदेश महिला अध्यक्षा सौ. पुष्पाताई पी आत्राम प्रमुख उपस्थिती- सरपंच - चिखलगाव ग्रामपंचायत सौ रुपालीताई सुनिल कातकडे

क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

प्रमुख अतिथी -सदस्या - ग्रामपंचायत चिखलगाव सौ वनिता ताई सिडाम,मार्गदर्शक-

सेवानिवृत्त - नायब तहसिलदार तथा - जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद ,प्रमुख मार्गदर्शक -

महोदय कोचिंग क्लासेस  

 मोहदय शेंडे सर,

 तालुका अध्यक्ष - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, तथा संचालक - वसंत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी , वणी मा अशोक भाऊ नागभिडकर तसेच शंकर किनाके सचिव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, सुभाष आडे साहेब, चितामण आत्राम साहेब , सुधाकर आत्राम साहेब, तसेच बिरसा मुंडा विचार मंच चे भालचंद्र तोडकर ,गौरव कुमरे, सुरज तोडकर  , प्रयास कुमरे ,मानव उईके, सुरज ठुमणे, हर्षल निकुरे, तनिष खैरे ,प्रेम तोडकर, राकेश गौरकार, प्रज्वल कुत्तरमारे आदी उपस्थीत होते व या कार्यक्रमाचे संचालन गौरव देविदास कुमरे यांनी केले व आभारप्रदर्शन अशोक सदाशिवराव नागभिडकर यांनी केले .Commemoration ceremony of students on the occasion of Krantiveer Bhagwan Birsa Munda Memorial Day


▫️ बिरसा मुंडा यांचा उलगुलान जल, जंगल जमिनीसाठी होता - ऍड. अरविंद सिडाम

▫️ राजूर येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या स्मृती दिनाला अभिवादन

__________________

वणी : " बिरसा मुंडा यांना वयाच्या २५ व्या वर्षी इंग्रजांनी विष देऊन संपविले. परंतु त्यांच्या संघर्ष हा निव्वळ इंग्रजां विरोधातच नव्हता तर त्यांची खरी लढाई ही या देशातील मूळ निवासियांच्या जल, जंगल व जमिनी वरील हक्कांचा होता." असे प्रतिपादन राजूर कॉलरी येथील शहिद विर बिरसा मुंडा नगरातील बिरसा मुंडा चौकात झालेल्या कार्यक्रमात आदिवासी युवा जनजागृती संघटनेचे नेते ऍड . अरविंद सिडाम यांनी केले.


बिरसा मुंडा नगरात झालेल्या या क्रांतिवीर बिरसा यांच्या स्मृती दिनानिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, " क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या संघर्षातील जल, जंगल व जमिनीचे प्रश्न सध्या जास्त तीव्र झाले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देशातील नागरिकांचे ह्या मूलभूत अधिकारांवरील हक्क हिरावून घेण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असून जल, जंगल व जमीन भांडवलदारांच्या घश्यात घालण्याचे महापाप करीत आहे. ह्या विरोधात कधी नव्हे तेवढा संघर्ष वाढला आहे. आज क्रांतिवीर बिरसा यांना अभिवादन करताना जनतेला हक्काचा समान असलेला वाटा मिळत नाही तोपर्यंत बिरसा यांचा उलगुलान पूर्ण होणार नाही." 


या झालेल्या स्मृतिदिन चे कार्यक्रमाला नगरातील स्त्री पुरुष व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top