-->

हारमोनी मिनरल्स या चुन्याच्या कंपनीच्या अनधिकृत बांधकामाला भालर गावकऱ्यांचा विरोध Bhalar Villagers Oppose Unauthorized Construction of Harmony Minerals Lime Company

0

हारमोनी मिनरल्स या चुन्याच्या कंपनीच्या अनधिकृत बांधकामाला भालर गावकऱ्यांचा विरोध :

संगिनी न्यूज 

वणी :  शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर  येथील नव्यानेच सुरु  हार्मोनी मिनरल   करणाऱ्या कंपनीला  कोणतीही लोक सुनावणी न घेता प्रशासनाने राजकीय बाळाचा वापर करून परवानगी बहल केली आहे. ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता, ग्रामसभा,मासिक सभेचा ठराव नसताना गावातील  जिल्हा परिषदेच्या शाळेपासून अवघ्या सातशे मीटर अंतरावर हि कंपनी उभी होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे भविष्य  शक्यता असल्याने ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. :

पाहणी न करताच प्रदूषण  मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र

        भालर गावापासून अवघ्या 800 ते 900 मीटर अंतरावर हारमोनी मिनरल्स या चुन्याच्या कंपनीचं अनधिकृत बांधकाम जोरात सुरू आहे. या कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायत चे अधिकार डावलून आचारसंहितेच्या काळात वरिष्ठ कार्यालयाकडून चिरीमिरीच्या जोरावर प्रदान करण्यात आले आहे. दिनांक 16 /6 /2024 पर्यंत अकृषकच्या जाहीरनाम्यावर आक्षेप घेण्याची मुदत असताना म्हणजेच अकृषक परवानगी व बांधकाम परवानगी नसताना सदर कंपनीचे बांधकाम वरिष्ठांच्या आशीर्वादाने जोरात सुरू आहे या कंपनीवर कडक कारवाई करून तिच्या सर्व परवानग्या रद्द न केल्यास  येत्या15 तारखेपासून कंपनीच्या समोर आमरण उपोषणाला बसण्याचा कडक इशारा ग्रामपंचायत भालरचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावकरी यांच्या वतीने संबंधित विभागाला देण्यात आला आहे-

पाहणी न करताच प्रदूषण  मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र 

संबंधीत कंपनीने प्रथम ग्राम पंचायतीचीचे ना-हरकत प्रमाणपत्र  बंधनकारक होते, आचारसंहितेचा काळ असल्याने ग्राम पंचायतीने आचारसंहिता संपताच सदर विषय ग्राम पंचायतीच्या मासिक साभेत  पटलावर ठेऊन चर्चा करणार असे सांगितले असतांना  कंपनी प्रशासनाने  मनमानी करीत वरिष्ठ  अधिकाऱ्यांना हाताशी धरून  ना- हरकत प्रमाणपत्र मिळविले आहे. यात प्रदूषण नियामक मंडळाने संबंधित क्षेत्राची भागोलिक पाहणी सुद्धा केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांचा  विरोध असतांना देखील ना-हरकत  प्रमाणपत्र बहाल केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. 

उपोषणाचा इशारा 

हार्मोनी मिनरल कंपनीला बहाल केलेले ना-हरकत प्रमाणपत्र रद्द न केल्यास सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामस्थ उपोषण आंदोलन कार्याच्या तयारीत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा सुद्धा दिला आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top