माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला दुष्काळ स्थितीचा आढावा
यवतमाळ जिल्हा पाण्याच्या टंचाईने अतिशय ग्रासला असून दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. अमरावती विभाग काँग्रेस दुष्काळ पाहणी समितीची प्रमुख माजी. मंत्री यशोमतीताई ठाकूर आज यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळाबाबत पाहणी करून आढावा घेतला. यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे पदाधिकारी आणि तालुका अध्यक्ष यांच्याशी जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात चर्चा झाली. Former minister Yashomati Thakur reviewed the drought situation
आढावा सभेमध्ये वणी तालुका व शहराच्या समस्येचा पाढा वणी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे यांनी वरिष्ठां कडे मांडला त्यात ग्रामीन भागात तसेच शहरात सतत रोज एका एका तास नंतर वीज पुरवठा खंडित होणे, शेतामध्ये वीज टॉवर उभे केले त्याचा पूर्ण मोबदला अजून पर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही ,शेतकऱ्यांनि विचारणा केली असता त्यांना धमकविल्या जातात, पीक विमा संरक्षण मिळाला नाही, बोगस बियाने विक्री, फ्लोराईड युक्त पाणी समस्या, दुष्काळ ग्रस्त गावागावात पाणी पुरवठा करणे, प्रीपेड मीटर, शहरामध्ये चार चार दिवसांनी होणारा पाणी पुरवठा,चालू कर्ज भरूनही हंगाम तोंडावर आला तरी नवीन कर्ज काही शेतकऱ्यांना मिळाले नाही ,जळजीवन योजनेचा बट्याबोल इत्यादी समस्येवर लक्ष वेधले.माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी या सर्व समस्या सरकार दरबारी मांडू आणि पावसाळी अधिवेशनात लावू कारण तालुका स्तरावर कितीही निवेदने दिली तरी विरोधकाच्या अडचणी दुर्लक्षित केल्या जाते, यावेळी गोवा प्रभारी माननीय माणिकरावजी ठाकरे, अखिल भारतीय आदिवासी अध्यक्ष माननीय शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके जी माजी आमदार वामनराव कासावार जी, माननीय आमदार वझाहत मिर्झा, दिलीपराव येडातकर , जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल राव मानकर, मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण दादा देशमुख काँग्रेस समितीचे सचिव माननीय जावेद अन्सारी, देवानंद पवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रशासन,महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष संध्याताई बोबडे, वणी तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम पावडे, झरी तालुका काँग्रेस अध्यक्ष आशिष खुलसंगे, मारेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार, शहराध्यक्ष चंद्रशेखरजी चौधरी, अनिल गायकवाड, उषाताई दिवटे, अतुल भाऊ राऊत ,वैभव जवादे,विजय मोघे,किरण कुमरे,कृष्णा पुसनाके, नंदु कुडमथे,लाला तेलगोटे,पंडीत कांबळे,कौस्तुभ शिर्के, सौ.विद्या परचाके, सौ.पल्लवी रामटेके,छोटुभाऊ सवाई,सौ.वैशाली सवाई,मिलिंद रामटेके, विद्याताई पातालबंन्सी,शब्बीर खान,आशिष मह्हले,यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

-min%20(1).jpg)