दिकुंडवार क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे सुयश
वणी येथील रंगारीपुरा येथे मागील पंधरा वर्षापासून दीकुंडवार सरांचे इंग्लिश ट्युशन क्लासेस सुरू आहे. दरवर्षी या ट्युशन क्लासेस मधून उच्चतम मार्क घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण होत असतात.मागील वर्षी इयत्ता बारावी मध्ये वैष्णवी सुभाष नरपाडे या विद्यार्थिनीने 86.टक्के तर इयत्ता दहावी मध्ये समीक्षा दीपक भोगडे या विद्यार्थिनीने 90% मिळविले होते. हीच यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी आजही कायम ठेवलेली आहे.
दीकुडवार सर हे उच्च दर्जाच्या शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवीत असतात आणि विद्यार्थ्यांना स्टेज डेरिंग वाढविण्याकरता प्रवृत्त करत असतात.
यावर्षी यांच्या ट्युशन क्लासेस मधून इयत्ता दहावी मध्ये पियुष कैलास पारखी या विद्यार्थ्यांनी 85.20% , तर विशेष अशोक भंडारवार 81.60 टक्के, सक्षम आनंद भोगडे 80.60 टक्के ,आयुष दिवाकर बोबडे 78% मनीष पंढरी महाकुलकर 77.20% .ईशान उमेश बेसेकर 76.20 % ,आस्था बाबाराव बेसेकर 73.80% .साहिल कैलास करनेवार 71.80टक्के आलमगीर शहा 71.40 टक्के ,हरीश संतोष घाटे 70.80% हे विद्यार्थी उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहे.Suyesh of students of Dikundwar classes
हे सर्व विद्यार्थी आपल्या याच्याशी श्रेय आई-वडिलांना वडीलधाऱ्यांना आणि गुरुजनाना देतात
: दिकुंडवार क्लासेस च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
येथील दिकुंडवार सर इंग्लिश ट्युशन क्लासेस च्या वतीने इयत्ता दहावी मध्ये यावर्षी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष राजूभाऊ धावंजेवार उपस्थित होते. यावर्षी इयत्ता दहावी मध्ये 85.20% घेऊन उत्तीर्ण झालेला विद्यार्थी पियुष कैलास पारखी तसेच सक्षम आनंद भोगडे ८०.६०% .विशेष अशोक भंडारवार ८१.२०% यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी ' ' 'विद्यार्थ्यांचे भवितव्य हे शिक्षकाच्या हाती असते तेव्हा विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन यश संपादन करावेत ' असे उद्गार राजूभाऊ धावजेवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिकुंडवार सर यांनी केले

