-->

खासदार प्रतिभा धानोरकरांची वणीत भव्य विजयी रॅली Pratibha Dhanorkar's grand victory rally in Wani

0


खासदार प्रतिभा धानोरकरांची वणीत भव्य विजयी रॅली


Sangini news Wani

वणी:- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा सुफडा साफ करीत प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची वणी शहरात भव्य विजयी मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत असंख्य मतदात्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन संजय खाडे यांनी केले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकरांची वणीत भव्य विजयी रॅली



राज्यात महाविकास आघाडीने बाजी मारत 30 जागा आपल्या पदरात पाडल्या आहेत. यात काँग्रेस पक्षाने 13 जागांवर विजय मिळवीत महाराष्ट्रात प्रथमस्थान मिळविले आहे. यात एक बंडखोर खासदार सुद्धा आहे.MP Pratibha Dhanorkar's grand victory rally in Wani

यातच सर्वात प्रतिष्ठेची जागा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची होती. येथे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तगडे उमेदवार असतांना महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आव्हान स्वीकारत मुनगंटीवार यांना जणू शह दिला होता. निकरीची लढाई जनतेनी सोपी करीत प्रतिभा धानोरकर याना अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून दिले आहे.

याच पार्श्वभूमीवर वणीत सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक,खाती चौक,गांधी चौक, मोडकी कमान, नटराज चौक,गाडगेबाबा चौक, नृसिंह व्यायाम शाळा, दीपक चौपाटी,काठेड ऑइल मिल,सर्वोदय चौक,टागोर चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, या मार्गाने येऊन शेवटी शिवतीर्थावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत मतदार राजांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन संजय खाडे यांनी केले आहे. सोबतच जाहीर सत्काराचा कार्यक्रम देखील होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top