वीज पडून चार बकऱ्या ठार
Sangini News Wani
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कवडसी येथे वीज पडून चार बकऱ्या ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.Four goats killed by lightning
तालुक्यातील कवडसी येथील भाऊराव कामतवार हे बकऱ्या चरायला कवडसी शेत शिबारात गेले होते. अचानक ढग दाटून आले अन विजेचा कडकडाट सुरू झाला. दरम्यान बकऱ्या सैरभैर पळायला लागला अन अन यातील चार बकऱ्या एकाच ठिकाणी जाऊन थांबल्या. प्रसंगी वीज लोमकळली अन त्याच बकऱ्यावर पडली. यात भाऊराव कामतवार यांच्या तीन नग आणि प्रभाकर चिडे यांची एक नग बकरी विजेच्या तांडवात मृत्युमुखी पडली.
या घटनेचा पंचनामा करून महसूल विभागाने शासनाची मदत मिळावी अशी पशुपालकांनी मागणी केली आहे.

.jpg)