-->

शिबला परिसरात भुरट्या दलालांचा सुळसुळाट Scam of crooked brokers in Shibla area

0

 शिबला परिसरात भुरट्या दलालांचा सुळसुळाट 

sangini news 

झरीजामणी तालुक्यातील शिबला परिसरातील शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज पुनर्स्थापित करण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना भूलथापा देऊन त्यांची कर्जाची रक्कम बँकेत भरून त्यांच्याकडून भरमसाठ रक्कम उखळणाऱ्या भुरट्या दलालांचा शिबला परिसरात सुळसुळाट सुरु आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. Scam of crooked brokers in Shibla area

शिबला परिसरात भुरट्या दलालांचा सुळसुळाट Scam of crooked brokers in Shibla area

अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिबला परिसरातील आदिवासी आदिम समाजातील शेतकऱ्यांना वेळीच कर्ज पुरवठा होण्याचे दृष्टीने याआधी शिबला तेथे राष्ट्रीयकृत बँक होती. मात्र ग्राहक कमी असल्याने सदर बँक पांढरकवडा येथे स्थलांतर करण्यात आली - त्यानंतर या परिसरातील ग्राहकांचे व्यवहार पांढरकवडा येथून व्हायला लागले.  हीच बाब हेरून शिबला परीसरातील जोडी सक्रिय झाली.  त्यांनी थकीत असलेले शेतकरी ग्राहक निवडून त्यांना रक्कम आम्ही भरतो त्यावर १०% दराने व्याज अशी आकारणी करून बँकेत नेण्यास सुरुवात केली. यात दलालांचा मोठ्या प्रमाणात फायदा असल्याने शेतकऱ्यांना वाहनात बसून घेऊन जाणे सुरु केले आहे. यात महत्वाचा भाग म्हणजे थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज पुरस्थापित करण्यासाठी बँक आर्थिक मदत करते. त्यानंतर त्यांच्या नावे वाढीव कर्ज मंजूर करते. एकूणच यात दलालाची जोडी त्यांनी भरलेली अर्धी रक्कम, त्या रकमेवरील १०% व्याज आणि इतर खर्च गरीब शेतकऱ्यांकडून अवाजवी वसूल करतांना दिसते आहे. प्रशासनाने वेळीच या जोडीचा बंदोबस्त करायचा असेल तर बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून कारवाई करणे अपेक्षित आहे. यानंतर पुढील हंगामाचे कर्ज वाटपास सुरुवात होणार आहे. या जोडीचे हेच काम असल्याने बँक व्यवस्थापकाला हाताशी धरून गरीब शेतकऱ्यांची लूटमार सुरु आहे. राजकीय वरदहस्त असल्याने या जय-वीरू जोडीचे चांगलेच फावत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top