-->

सर आली धावून वीज गेली वाहून

0

 सर आली धावून वीज गेली वाहून 

संगिनी न्यूज 

वणी : रविवारी रात्री ११ वाजताच सुमारास पावसाची एक सर आली अन वीज गूल झाली. हे प्रकार नित्याचेच झाल्याने वणीकर पुरते त्रस्त झाले आहेत. Sir came running carrying electricity

सर आली धावून वीज गेली वाहून

रात्रीला पावसाची एक लहानशी सर आली आणि वीर गूल झाली.   तब्बल दोन तास वीज आलीच नाही. हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. एकदा खंडित झालेला वीज पुरवठा तब्बल दोन तास तरी सुरळीत होत नाही.  परिणामी आधीच ४४ अंश तापमानाच्या उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक पुरते वैतागून गेले आहेत. दिवसभर पंखे,कुलर,लावल्याशिवाय  साधे घरात राहणे हि कठीण आहे. त्यात दिवसभर विजेचा लपंडाव सुरूच असतो. घरातील उपकरणे सुद्धा निकामी होण्याची शक्यता आहे, वणी शहरातील महावितरणचे  अधिकारी  करतात तरी काय? असा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतो आहे.वारंवार  वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक महावितरण वर रोष व्यक्त करतांना दिसते आहे.   बिलाचा एक महिना थकला तर महावितरण चे कर्मचारी ग्राहकांना सळो, कि पळो करून सोडतात, मात्र सेवा देण्यात महावितरण चालढकल मोहीम राबवित आहेत. जी कामे हिवाळ्यात करावयाची असताना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कामे काढून नागरिकांना हैराण करण्यात येत असल्याचे आरोप नागरिक करीत आहेत. यापूर्वी अशी स्थिती कधीच बघायला मिळाली नाही. दिवसरात्र विजेचा लपंडाव सुरु असल्याने वैतागलेले ग्राहक पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करीत आहेत. एकूणच काय, तर सर आली धावून वीज गेली वाहून अशी म्हणायची वेळ आली आहे 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top