विजय चोरडिया यांच्या विविध उपक्रमाने मतदारात उत्साह!
वणी:- (संगिनी न्यूज)
सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. यासाठी महायुती ,महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार मतदारांच्या भेटीगाठीत व्यस्त आहेत. मात्र यात भाजपचे विजय चोरडिया गोरगरीब जनतेच्या सेवेत असल्याने सामान्य जनतेच्या पसंतीला ते उतरले आहेत. परिणामी या विधानसभा निवडणुकीत विजय चोरडिया हे भाजपचे दावेदार राहणार निश्चित असण्याची शक्यता आहे.
विविध जाती,धर्मातील जनतेच्या सेवेत असणारे वणी येथील भाजपचे नेते विजय चोरडिया यांनी वणी(७६) विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत. नेहमीच गोरगरिबांच्या सेवेत असलेले विजय चोरडिया यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले,विकलांग,दिव्यांग लोकांना सर्वोतोपरी मदत केलीत, अस व्यक्तिमत्त्व आज घडीला वणी विधानसभेचे नेतृत्व करण्यास8सक्षम असणार असे वाटतेय.
आता विद्यमान आमदार,आणि जिल्जाध्यक्ष किती शह देणार की,विजय चोरडिया उमेदवारीची बाजी मारणार हे येणारा काळच ठरवेल?
विविध क्षेत्रात भरीव कार्य!
कामगारांच्या आंदोलनापासून विजय चोरडिया यांची राजकारणाची सुरुवात झाली. यात गावागावात वाचनालय, अपंगांना व्हीलचेअर,अभ्यासिका खेळाडूंना प्रोत्साहन बक्षीस,यासह अनेक जाती धर्म यातील लोकांत सहभाग त्यांनी नेहमीच घेतला.
येऊ द्या कोणी, दावा आपलाच!
समाजसेवेचे व्रत घेऊनविजय चोरडिया यांनी जनयेची सेवा करण्याचे व्रत घेत असंख्य जनतेला सेवा पुरवली आहे. परिणामी या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांना डावलून मी माझा दावा करणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे.आता यात विद्यमान आमदार, जिल्हाध्यक्ष कोणत्या बळावर लढणात हे येणारा कालच ठरवेल! तरीसुद्धा विजय चोरडिया यांचे पारडे जड आहे.
वणीची उमेदवारी खेचून आणणारच!
मी वणी विधानसभा क्षेत्रात आज गेली २५ ते ३० वर्षापासून सामाजिक अन राजकीय क्षेत्रात जनतेच्या सेवेत असल्याने जनता माझ्या सोबत आहेत.विद्यमान लोकप्रतिनिधी, आणि इतरांचे कामे बघितले तर, माझ्या इतकं कार्य कोणीच केले नाहीत. परिणामी वणी विधानसभा क्षेत्रात भाजपच्या उमेदवारीचा दावा माझाच असणार!
विजय चोरडिया
वणी

.jpg)