-->

सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांचे नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

0

 सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांचे नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

वणी(संगिनी न्यूज)

वणी येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी परिसरातील जनतेसाठी रुग्णसेवेचा ध्यास घेत नेत्र शस्त्रक्रिया, तपासणी अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. परिणामी रुग्णांना एक प्रकारे जणू आधारच मिळाला आहे. Organized eye check up and eye surgery camp by social activist Vijay Chordia

सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांचे नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन



     वणी परिसर प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे. परिणामी परिसरातील जनतेला डोळ्यांचे,श्वासाचे आजार वाढले आहे. यासाठीच जनतेची सेवा करण्याच्या हेतूने प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात नेत्र, तपासणी,नेत्र शस्त्रक्रिया, व चष्मे वाटप शिबिर अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. सोबतच इतरही आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे.

  येत्या २७ जुलै रोजी वणी येथील जैताई मंदिर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १ ऑगस्ट ला  झरी तालुक्यातील पाटण येथील तिरुपती बालाजी मंदिरात सुद्धा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन विजय चोरडिया यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top