-->

शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करून सुद्धा कर्ज मिळाले नाही.

0


शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करून सुद्धा कर्ज मिळाले नाही.





वणी (रवी ढुमणे)


वणी तालुक्यातील पेटूर येथील शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाची परतफेड करून देखील त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज दिले नसल्याची तक्रार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ चे माजी अध्यक्ष प्रा टिकाराम कोंगरे यांना दिले आहे.
शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करून सुद्धा कर्ज मिळाले नाही.

पेटूर येथील शेतकऱ्यांचे माजी अध्यक्षांना निवेदन!

जिल्हा सहकारी बँक यवतमाळ यांच्या पेटूर येथील सहकारी संस्थेचे सचिवाने शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड करून देखील त्यांनाशेतीसाठी कर्ज नामंजूर केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा टिकाराम कोंगरे यांचेकडे केली आहे.

यात ग्राम विकास कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव जी एस राऊत व बँकेचे अधिकारी यांनी आम्हाला कोणतेही आदेश नसल्याने आम्ही ते करू शकत नाही असे बोलले. सद्यस्थितीत पाऊस जास्त असल्याने दुबार पेरणोची वेळ आली. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी संकट अशा विवंचनेत बळीराजा अडकला आहे. एक वर्ष थकीत कर्ज असल्याने आम्ही तुम्हाला पीककर्ज देऊ शकत नाही असे संबंधितांनी सांगितले. यात संजय दादाजी बुरडकर व अनेक शेतकरी थकीत कर्ज भरून सुद्धा पीक कर्जपासून वंचित आहे.

सदर शेतकरी वीस ते पंचवीस वर्षांपासून खातेदार असतांना कर्मचारी व अधिकारी मनमानी करीत असल्याचा आरोप  प्रवीण महादेवराव झाडे, व इतर शेतकऱ्यांनी करीत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा टिकाराम कोंगरे यांना व इतरांना निवेदन दिले आहे.


राज्य सहकारी बँकेचे अर्थ साहाय्य मिळाले की,आमच्या वंचित शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसात नक्कीच मदत करणार!


प्रा. टिकाराम कोंगरे

माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top