-->

झरी तालुक्यातील अविनाश मडावी चा गुवाहाटी आय.आय.टी. व दिल्ली येथील सुप्रसिद्ध शिवनादर विद्यापीठात प्रवेश

0


झरी तालुक्यातीलअविनाश मडावी चा गुवाहाटी आय.आय.टी. व दिल्ली येथील सुप्रसिद्ध शिवनादर विद्यापीठात प्रवेश



वणी(रवी ढुमणे)

आदिवासी बहुल असलेल्या झरी जामनी तालुक्यातील मुच्छी येथील अविनाश परशुराम मडावी या युवकाने उत्तुंग भरारी घेत आय.आय.टी. गुवाहाटी व सुप्रसिद्ध शिवनादर विद्यापीठ मध्ये प्रवेश मिळविला आहे.
झरी तालुक्यातीलअविनाश मडावी चा गुवाहाटी आय.आय.टी. व दिल्ली येथील सुप्रसिद्ध शिवनादर विद्यापीठात प्रवेश



जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामनी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपंन्न


मुच्छी येथील अविनाश परशुराम मडावी यांना अतुलनिय यशाबद्दल सत्कार करून जयंती उत्सव समिती झरी चे वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे माजी अध्यक्ष, तथा संचालक प्रा.टिकाराम कोंगरे यांनी सुद्धा आर्थिक मदत केली आहे.


जामनी येथील जिल्हा परिषदे च्या शाळेत इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी जामणी,झरी व दुर्गापूर येथील विद्यार्थी सदर सोहळ्यास उपस्थित होते. शाळेतून एकलव्य रेसिडेन्सी स्कुल करिता पात्र झालेल्या देवयानी प्रमोद मेश्राम व वैभवी वामन सोयाम व समाज कल्याण वसतिगृहा करिता प्रवेशपात्र झालेली राणी राहुल ठाकरे या विद्यार्थिनीचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात उच्चशिक्षणाकरिता घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची भीती नाहीशी करून त्यांच्या मनात नवी प्रेरणा निर्माण करण्याच्या हेतूने, अविनाश परशराम मडावी याच्या गुवाहाटी आय.आय.टी. व दिल्ली येथील सुप्रसिद्ध शिवनादर विद्यापीठ या ठिकाणी प्रवेशाच्या यशाबद्द्ल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनीलजी काटकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्राध्यापक टीकारामजी कोंगरे गुरुजी, सूर्यतेज कला महाविद्यालयाचे प्राचार्य पाईलवार सर, एॅडवोकेट दीपक काटकर, प्राध्यापक खरात सर, विस्तार अधिकारी एन.डि. किनाके, माजी सैनिक व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी सन्माननीय सुनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते बंडू पारखी, समितीचे उपाध्यक्ष संदीप लेनगुळे,मुख्याध्यापक विनोद मडावी,सामाजिक कार्यकर्ते श्री पांडुरंग पोयाम, तुकाराम आत्राम मारोती कुसराम,नन्नुभाऊ कोडापे,सुनिल गुरनुले,विनोद डोहे,केशव कोडापे, अमोल मंचलवार, प्रवीण मंचलवार राहुल ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 जयंती उत्सव समिती झरी व प्राध्यापक टिकारामजी कोंगरे यांचे वतीने अविनाश मडावी याला शिष्यवृत्ती व भारतीय संविधानाची प्रत प्रदान करण्यात आली. जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा कोडपाखिंडी च्या मुख्याध्यापिका विभाताई मडावी व तेथील विद्यार्थी यांनी याप्रसंगी "एक होता कार्व्हर" हे प्रेरणादायी पुस्तक अविनाश मडावी यांना भेट स्वरूपात दिले..
      कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सुवर्णा अक्कलवार, रेखाताई जिड्डेवार, विठ्ठल ऊईके,प्रशांत सोयाम,अविनाश कुडमेथे नागेश सोयाम,विलास मंचलवार व जामणी गावातील समस्त नागरिक व माजी विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कुमारी श्रेया चाटारे व कान्हा मंचलवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विनोद मडावी यांनी केले तर टिकारामजी कोंगरे, ऍडव्होकेट दीपक काटकर, किनाके साहेब प्राचार्य पाईलवार सर,विनोद मडावी रुद्राजी कुचनकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती अविनाश मडावी यांनी आपल्या भाषणातून परिस्थिती वरती मात करण्यास शिका, मनात संकोच न ठेवता व कुठली भीती न बाळगता नियमित नव्या ज्ञानाच्या शोधात राहा. अपयशाने खचून जाऊ नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी दाखविलेल्या मार्गाने सतत प्रयत्नरत रहा. देशातील नामांकित विद्यापीठात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. अविनाश चे यश बघून सर्वांनी कौतुक केले.

युक्ता रवी सुचिता खंडाळकर हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! बाळा

शुभेच्छुक

पौर्णिमा संतोष भोंगळे, वर्षा दिलीप भोंगळे, मंगला दिलीपराव खंडाळकर, दिग्विजय पौर्णिमा संतोष भोंगळे श्रवण दिलीप भोंगळे आणि समस्त परिवार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top