-->

बाप - लेकाला विषारी सापाचा चावा.......विषारी सापाचा दंश..अन वर्षभराच्या चिमुकल्याचा मृत्यु.

0

 बाप - लेकाला विषारी सापाचा चावा.......विषारी सापाचा दंश..अन वर्षभराच्या चिमुकल्याचा मृत्यु...

वणी :- 


      वणीतील मोक्षधाम जवळ शास्त्री नगर येथील एका कुटुंबातील सर्व कुटुंब गाढ झोपेत असताना बाप लोकांवर काळाचा घाला होऊन विषारी सापाने त्यांना दंश केल्याची घटना दि 24 ला पहाटे 2 वाजताच्या दरम्यान घडली. या दुर्दैवी घटनेत अं एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. दक्षित सुमित नेलावार असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे व वडीलांची प्रकृती चिंताजनक आहे.Father-daughter bitten by poisonous snake..

बाप - लेकाला विषारी सापाचा चावा.......विषारी सापाचा दंश..अन वर्षभराच्या चिमुकल्याचा मृत्यु...

     प्राप्त माहितीनुसार, शहरातील शास्त्री नगर परिसरातील वास्तव्यात असलेले नेलावार कुटुंबीय दि 24 ला गाढ झोपेत असताना पहाटे 2 वाजताच्या दरम्यान वडील सुमित नेलावार (अं ३५), मुलगा दक्षित सुमित नेलावार (अं 1 वर्ष) यांच्यासह सुमितची पत्नी व मुलगी हे सुद्धा घरातच झोपुन होते. दरम्यान वडील सुमित अन अं एक वर्षीय चिमुरडा मुलगा दक्षित च्या अंथरुणात विषारी साप शिरून त्या दोघांना चावा घेतल्याने चिमुरडा रडू लागला अन वाडीलासह संपूर्ण परिवाराला जाग आली. 

    तात्काळ वडील सुमित व चिमुरड्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात आले. दरम्यान त्याला तात्काळ वणीतील रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांनी त्या दोघांनाही चंद्रपुर येथे उपचारासाठी रवाना केले. दरम्यान अं एक वर्षीय चिमुरड्याचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असुन, वडील सुमित नेलावार यांचीही प्रकृती चिंताजनक असुन त्यांचा चंद्रपुर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. चिमुकल्याच्या दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top