धारदार तलवार बाळगणारे दोघे एलसीबीच्या ताब्यात
पोलीस स्टेशन पांढरकवडा व घाटंजी परिसरातुन धारधार तलवार बाळगणा-या दोघांना ताब्यात घेवून केली कारवाई नोंद स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई। Two carrying sharp swords in custody of LCB
आज दिनांक 24/07/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक उघड गुन्हे उघडकीस आणने व अवैध धंदेविरुध्द कारवाई करणे संबंधाने पांढरकवडा उपविभागात पेट्रोलीग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदाराव्दारे माहिती मिळाली की, पो.स्टे. पांढरकवडा हद्दीतील इंदीरानगर परिसरात राहणारा प्रविण गुरणुले हा त्याचे राहते घरात धारधार तलवार बाळगुण आहे अशा माहिती वरुन तात्काळ पथकाने घटनास्थळ गाठुन माहिती प्रमाणे प्रविण गुरणुले याचे घरी जावून आवाज देवुन बोलविल्यावर समक्ष हजर येणारे इसमास त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव प्रविण शेखर गुरणुले वय 23 रा. बार्ड नं 7 इंदीरानगर पांढरकवडा असे सांगीतल्याने त्यास घरझडतीचा उद्देश समाजावुन सांगुन पंचासमक्ष त्याचे राहते घराची झडती घेतली असता एक
धारधार लोखंडी तलवार किमंत 500/- रु ची मिळुन आल्याने जप्त करुन आरोपी विरुध्द भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करणे कामी मुद्देमाल व आरोपी प्रविण शेखर गुरणुले वय 23 रा. वार्ड नं 7 इंदीरानगर पांढरकवडा यास पो.स्टे. पांढरकवडा यांचे ताब्यात देण्यात आले.
त्याच प्रमाणे नमुद कारवाई संपवुन पथक परत पेट्रोलींग करीता रवाना झाले असता गोपणीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, घाटंजी शहरातील घाटी परिसरात एक इसम त्याचे मोपेड वाहनावरती धारधार तलवार घेवुन दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत आहे अशा माहिती वरुन पथकाने माहीतीचे गांभीर्य लक्षात घेवुन तात्काळ घाटी परिसर पो.स्टे. घाटंजी येथे पोहचुन माहिती प्रमाणे मोपड वाहन चालक इसमाचा शोध घेत असतांना संशयीत मोपेड वाहन दिसुन आल्याने त्यास थांबवून चालकास त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नांव विनायक गजानन काळे वय 20 वर्षे रा. मानोली ता. घाटंजी जि. यवतमाळ असे सांगीतल्याने पंचासमक्ष त्याचे वाहनाची झडती घेतली असता एक स्टीलची धारधार तलवार कि.अ. 1000 रु ची मिळून आल्याने सदरची तलवार व मोपेड वाहन असा एकूण 61,000/- रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विनायक गजानन काळे वय 20 वर्षे रा. मानोली ता. घाटंजी जि. यवतमाळ याचे विरुध्द पो ठाणे घाटंजी येथे भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला
आहे सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ, डॉ. श्री. पवन बन्सोड सा, मा अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप सा., पोलीस निरीक्षक श्री, ज्ञानोबा देवकाते, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिश फुके सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

-min%20(1).jpg)