-->

आरोपीला वीस वर्षे सश्रम कारावास

0

 आरोपीला वीस वर्षे सश्रम कारावास


नराधमाला पाणी प्यायला दिले अन् घात झाला : सात वर्षीय बालीकेवर बलात्कार



वणी : सात वर्षे बालिकेला पिण्यासाठी पाणी मागून तिने पाणी दिल्यानंतर 39 वर्षीय व्यक्तीने सदर बालिकेला उचलून नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी आरोपीला वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच दंड ठोठावला आहे.

आरोपीला वीस वर्षे सश्रम कारावास


या संदर्भात न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले यातील आरोपी कवडू दौलत बोबडे वय वर्ष 39 याने आपल्या परिसरात तील सात वर्षे बालिकेला 18 मार्च 2020 रोजी तिच्या घरी जाऊन तिला पाणी मागितले होते या वेळेला सदर बालिका घरात एकटीच

होती तिची आई आणि वडील हे दोघेही आपापल्या कामावर निघून गेले होते सदर बालिकेने पाणी आणून दिल्यानंतर आरोपी ने याने तिला उचलून नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. सदर बालिकेचे आई-वडील कामावरून परत आल्यानंतर बालीकेने

घडलेली घटना आई-वडिलांना सांगितली आईने तात्काळ नायगाव बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यानंतर डॉक्टर दास यांच्या दवाखान्यात आणि शेवटी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार केले त्यानंतर शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रार

दाखल केली शिरपूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल करीत आरोप पत्र न्यायालयात दाखल केले या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धावळे यांनी करून संपूर्ण गुन्ह्याचा तपशील आपल्या आरोपात मांडला न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यानंतर सुनावणी झाली यामध्ये एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले याशिवाय वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली या सर्व साक्षी पुराव्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला त्यामुळे विद्यमान न्यायालयाने आरोपीला कलम 376 अंतर्गत वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा त्यानंतर कलम 450 अंतर्गत तीन वर्ष सश्रम कारावास एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त साधा करावा तसेच बाल लैंगिक अत्याचार पासून बालकांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत वीस वर्षे सश्रम करावा साडेतीन हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिन्याची अतिरिक्त करावासाची शिक्षा शिवाय पक्ष अंतर्गत वेगवेगळ्या शिक्षा सुनावले आहेत या सर्व शिक्षा एकाच वेळी भोगावयाचे असल्याने आरोपीला वीस वर्ष कारावास भोगाव लागणार आहे या खटल्याचा निकाल विद्यमान न्यायमूर्ती विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी दिला या प्रकरणांमध्ये शासनाच्या वतीने सरकारी अभियोग्यता एडवोकेट प्रशांत मानकर यांनी युक्तिवाद केला तर आरोपीची बाजू एडवोकेट लोढा यांनी मांडली

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top