-->

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले विजय चोरडियानी दिली अपंग व्यक्तीला सायकल भेट

0

 



सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले विजय चोरडियानी दिली अपंग व्यक्तीला सायकल भेट

वणी(रवी ढुमणे)

वणी येथील प्रतिष्ठित असलेले सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांनी पोलिओ नंतर अपघातात अपंग झालेल्या व्यक्तीला सायकल भेट दिली आहे. Vijay Chordiani, a leader in social work, presents a bicycle to a disabled person in gift.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले विजय चोरडियानी दिली अपंग व्यक्तीला सायकल भेट


     वणी शहरातील नामांकित असलेले प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. नुकतेच त्यांनी अनेक ठिकाणी नेत्र तपासणी,शस्त्रक्रिया, चष्मे वाटप असे उपक्रम राबविले आहेत. सोबतच मोतीबिंदू  शस्त्रक्रिया सुद्धा करून घेतल्या आहेत.  येत्या २७ जुलै रोजी वणी येथील जैताई मंदिर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १ ऑगस्ट ला  झरी तालुक्यातील पाटण येथील तिरुपती बालाजी मंदिरात सुद्धा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन विजय चोरडिया यांनी केले आहे.


    प्रकाश भोयर यांना दिली सायकल भेट


प्रकाश बाबुलाल भोयर यांना आधीपासूनच पोलिओ झाला होता. परिणामी त्यांना अपंगत्व होतेच.त्यानंतर भोयर यांचा अपघात झाला होता. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र ती शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने अपंगत्व आले. ही माहिती मिळताच विजयबाबू चोरडिया यांनी प्रकाश ला आधार देण्याचे मनात आणले अन त्याला फिरण्यासाठी सायकल भेट  देत सामाजिक कार्य करीत मदत केली आहे.

असे अनेक उपक्रम राबवित गरजूंना मदतीचा आधार दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत. प्रसंगी अनेक कार्यकर्ते आणि त्यांचा चाहता वर्ग उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top