-->

विरकुंड येथील स्मशान भूमी रस्त्याचे निकृष्ट बांधकामाची तक्रार

0

 विरकुंड येथील स्मशान भूमी रस्त्याचे निकृष्ट बांधकामाची तक्रार 


वणी :-   तालूक्यातील विरकुंड येथे आमदार निधीतून १५ लाख रुपये मंजूर झालेल्या स्मशान भूमी रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ करण्यात आल्याची तक्रार ग्राम पंचायत सदस्य विद्या विलास कालेकर यांनी उपकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग वणी  यांचेकडे करीत सदर बांधकामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे. 

विरकुंड येथील स्मशान भूमी रस्त्याचे निकृष्ट बांधकामाची तक्रार  विरकुंड येथील स्मशान भूमी रस्त्याचे निकृष्ट बांधकामाची तक्रार


     वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विरकुंड गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी आमदार निधीतून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.  सादर रस्त्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले होते.  मात्र कंत्राटदारानाने रस्ता  बांधकामा करतांना रस्त्याची मजबुती,उंची,गुणवत्ता याबाबत कसलीही काळजी न घेता निकृष्ट साहित्य वापरून रस्त्याचे बांधकाम केले आहे.  Complaint of poor construction of cemetery road at Virkund

    आमदार निधीतून बांधकाम करण्यात आलेला रस्ता एक ते दोन महिन्यापूर्वी बांधण्यात आला असल्याचे तक्रारीत नमूद आहे. केवळ एक ते दोन महिन्यात संपूर्ण सिमेंट बांधकाम करण्यात आलेला रस्ता  पुरता उखळला आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. येथून ये-जा करणे कठीण झाले आहे. परिणामी या नव्यानेच बांधण्यात आलेल्या रस्त्यात जागोजागी खड्डे असल्याने पाण्याचा संचय होतो आहे . रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. विरकुंड येथील स्मशानभूमी कडे जाणाऱ्या निकृष्ट बांधकाम करण्यात आलेल्या रस्त्याची पाहणी करून सदर बांधकामाची चौकशी  करून देयकवार स्वाक्षरी करणाऱ्या अधिकारी ,कर्मचारी इ कंत्राटदार यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई  करून सदर विरकुंड येथील स्मशानभूमीकडे जाणारा नव्याने मजबूत करून देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यां विद्या विलास कालेकर यांनी उपकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग वणी यांचेकडे केली आहे. 


     ग्रामपंचायत सदस्यांचा निर्वाणीचा इशारा 

विरकुंड येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनविणाऱ्या कंत्राटदारावर ताबाडतोब कडक कारवाई न झाल्यास समोर होणाऱ्या घटनाक्रमाची संपूर्ण जबाबदारी  उपअभियंता व प्रशासनाची राहील असा निर्वाणीचा इशारा ग्राम पंचायत सदस्यां विद्या विलास कालेकर यांनी तक्रारीतून दिला आहे 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top