कापड दुकानात काम करणाऱ्या मजुराची आत्महत्या
वाणी: पोलीस ठाण्याच्या हाडदडीत येणाऱ्या मुरधोंनी येथील कापड दुकानात काम करणाऱ्या मजुराने घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजताच सुमारास उघडकीस आली आहे.
तालुक्यातील मुरधोंनी येथील पांडुरंग बापूराव तावाडे हा वणी शहरातील एका कापड दुकानात कामाला होता. घरी कोणी नसल्याचे बघून त्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली . हि बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरु केली. गावातील लोकांनी त्याला खाली उतरविले व गावातील पोलीस पाटील धोटे याना घटनेची माहिती दिली. धोटे पाटील यांनी सदर घटना पोलिसांना कळविली. व मृतदेह वणीच्या रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.icide of a laborer working in a textile shop
पांडुरंग चा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला . आणि घटनेची तक्रार पोलिसात दाखल केली. पांडुरंग ने आत्महत्या केल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याच्यामागे वृद्ध आईवडील, पत्नी १३ वर्षाचा मुलगा आहे.

