माजी पंचायत समिती सदस्यासह इतरांचा शिवसेनेत प्रवेश..
वणी- पंचायत समितीचे काँग्रेसचे माजी सदस्य डॉ मधूकर आसकर यांनी आपल्या सहकारयांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांचे नेतृत्व स्विकारत प्रवेश केला आहे. प्रसंगी शिवसेनेला आणखी बळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले आहे.एकूणच वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला आणखीच बळ मिळतांना दिसते आहे. Former Panchayat Samiti member joins Shiv Sena..
सध्या विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर महाविकास आघाडी,महायुती व इतर पक्षाची रंगीत तालीम सुरू असल्याचे बघायला मिळते आहे. यातच पक्षप्रवेश व इतर कार्यक्रमाची चांगलीच रेलचेल सुरू आहे. यात महाविकास आघाडीचे सध्यातरी वलय असल्याचे बघायला मिळते आहे. आता वणी विधानसभेची उमेदवारी काॅंग्रेस पक्षाला जाणार की, शिवसेनेला? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
यातच सध्यातरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राबल्य वाढतांना दिसते आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकरांनी वणी विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व स्विकारत पक्ष प्रवेश, संघटन बळकटीकरण आदी बाबीला प्राधान्य देत पक्षाला जणू बळच दिले आहे. परिणामी गावागावात संघटन अधिकच मजबूत होतांना दिसते आहे.
यातच काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य डाॅ मधूकर आसकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह, तसेच कोलेरा येथील उपसरपंच केशव पिदूरकर, कायरचे भिमराव मंदावार, आदींनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात वणी विधानसभा प्रमूख संजय देरकर यांच्या नेतृत्वात प्रवेश आहे. सोबतच झरी, मारेगांव,वणी तालुक्यातील तरूणांनी मागील आठवड्यात मोठ्या संख्येने शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. परिणामी आगामी काळात शिवसेना आणखीच मजबूत होतांना दिसते आहे. प्रसंगी माजी जिल्हा उपप्रमुख दिपक कोकास तालुका प्रमुख रवी बोढेकर,भालर ग्रामविकास कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय देठे सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
आगामी निवडणूकीत उडणार धूरळा!
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काॅंग्रेस पक्षात जवळपास 17 उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर केले आहेत. शिवसेनेत चार जणांनी उमेदवारी मागीतली आहेेे. अन् महायुती मध्ये अशीच काहीशी स्थिती आहे. आता पक्ष कोणाला उमेदवारी देणार हे बघणे महत्वाचे आहे. एकूणच 2024 च्या विधानसभा निवडणूकीत चांगलाच धूरळा उडण्याची शक्यता असल्याचे चित्र दिसायला लागले आहे.