मारेगाव येथे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कार्यकर्ता मेळाव्याला भरघोस प्रतिसाद!
वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात वणी विधानसभेचे प्रमुख संजय देरकर यांनी"माझी वीज माझा अधिकार" हे अभियान राबविल्यानंतर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या आदेशानुसार भगवा सप्ताहाचे आयोजन करीत गावागावात शिवसेनेच्या शाखा पुनर्गठीत केल्या आहेत. आणि या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात अनेक पक्षातील कार्यकर्त्यानी पक्षप्रवेश केला आहे.
सध्या वणी विधानसभेत महाविकास आघाडी ची जागा कोणाला मिळणार? हे सध्यातरी कोणालाच माहीत नाही. ?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे यवतमाळ जिल्यातील वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांचा झंझावात सुरू आहे. गावागावात"माझी वीज माझा अधिकार" हे अभियान राबवित, आता शिवसेना पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार त्यांनी वणी,मारेगाव ,झरी तालुक्यातील अनेक गावांत जाऊन प्रत्येक शाखा पुनर्गठीत केल्या आहेत. इतकेच नव्हे तर जनतेचा लढा म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून समाजकारणात कार्यरत असलेले विधानसभा प्रमुख संजय देरकर गावागावात प्रत्येक जनसामान्यांच्या भेटीला जाऊन अनेकांचे दुःख दूर केले आहेत. संजय देरकरांच्या अर्धांगिनी किरण संजय देरकर या महिलांसाठी अहोरात्र कार्य करीत आहेत.शिवसेनेत कोणाचीही दादागिरी खपवून घेतल्या जाणार नाही. राजेंद्र गायकवाड.!
शिवसेनेने अनेकांना मोठे केलेत मात्र जिल्ह्यातील नेते महिलांना सन्मान देत नाहीत. कार्यकर्त्यांना दमदाटी करून शिवसैनिक होणार नाही. आम्हाला शिवेसना पक्षप्रमुख(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यवतमाळ जिल्ह्यात तसेच वणी विधानसभा क्षेत्रात मोठे करण्यासाठी घर तिथे शिवसैनिक, धग मनात रुजवून आपल्याला कार्य करायचे आहेत. कोणत्याही दम दाटी करणाऱ्या मुजोर नेतृवाला बाजूला सारून आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मजबूत करायचे आहेत. असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.
प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, सोबतच माजी जिल्हा उपप्रमुख दीपक कोकास, महिला संघटिका डिमनताई टोंगे,नगराध्यक्ष मनीष मस्की, जितेंद्र नगराळे,गणपत लेडांगे,विधानसभा उप संपर्क प्रमुख संतोष माहुरे, मधुभाऊ वरटकर, देवा बोबडे, मालाताई बदकी, वर्षाताई किंगरे,सुनीताताई मस्की, स्वप्ना केलोडे,संघटिका, माजी नगरसेविका सुरेखा भेले, माधुरी नगराळे, वरारकर मॅडम, अजिंक्य शेंडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रसंगी या कार्यक्रमाचे संचालन तुळशीराम मस्की यांनी केले तर आभार गोवर्धन टोंगे यांनी मानले.