डेंग्यूचा वाढता पादुर्भाव, महिला काँग्रेस आक्रमक.
वणी;- परिसरात सध्या डेंग्यू,चिकणगुनिया, मलेरिया सारख्या आजारांचा थयथयाट सुरू आहे. यावर आजतागायत पालिकेने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. या आजारांवर मात करण्यासाठी नगर पालिकेने तात्काळ उपाययोजना कराव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा शामाताई तोटावार यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सोबत घेत मुळ्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत दिला आहे.Increasing prevalence of dengue, Women's Congress aggressive.
सद्यस्थितीत वणी शहर तसेच तालुक्यातील अनेक गावात डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत. डासांचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी घराघरात तापाचे रुग्ण बघायला मिळते आहे. या आजारांवर आळा घालण्यासाठी नगर पालिकेने हव्या त्या उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप काँग्रेस महिला आघाडीने करीत
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील उपाययोजना त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.
1. स्वच्छता मोहीमः सर्व रस्ते, गटारे आणि पाणी साचलेली ठिकाणे नियमितपणे स्वच्छ करा.
2. फवारणी:- मच्छरांचा नाश करण्यासाठी डेंग्यू प्रतिबंधक फवारणी ठराविक वेळाने करा.
3. जनजागृतीः- नागरिकांमध्ये डेंग्यूबाबत माहिती देऊन सुरक्षिततेचे उपाय समजावून सांगा.
4. आरोग्य सेवाः रुग्णालयांमध्ये डेंग्यू रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करा. आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.
तीव्र आंदोलनाचा इशारा
वरील उपाययोजना दोन दिवसांत सुरु केल्या नाहीत, तर नाईलाजाने तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. यात संपूर्ण आपली जबाबदारी असेल, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या दुर्लक्षाला आम्ही सहन करणार नाही. असा इशारा शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शामाताई तोटावार यांनी निवेदनातून दिला आहे.
प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, ओम ठाकूर, तालुकाध्यक्ष घनश्याम पावडे, नईम अजीज, सिद्दीक रंगरेज,अशोक पांडे सोबतच महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.