ग्रामपंचायत सदस्याचा पथदिवे लावतांना अपघात.

0


ग्रामपंचायत सदस्याचा पथदिवे लावतांना अपघात.


वणी:-- झरी जामनी तालुक्यातील निमनी गट ग्रामपंचायत सदस्याला दरारा गावात पथदिवे लावतांना विद्युतचा जबर झटका बसल्याने अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताचे सुमारास घडली आहे. त्याला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने येथीलच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. Accident of gram panchayat member while installing street lights.
ग्रामपंचायत सदस्याचा पथदिवे लावतांना अपघात.



झरी जामनी तालुक्यातील निमनी येथील अभिचंद शेडमाके हा ग्रामपंचायत सदस्य आहे. सध्या सणासुदीचे दिवसात गावात अंधार असल्याने ग्रामस्थांनी पथदिवे लावण्याची विंनती केली होती. बरेच दिवसापासून पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. परिणामी निमनी गट ग्रामपंचायत सदस्य सकाळीच निमनी वरून दरारा गावात गेला व खांबावर चढून पथदिवे लावत असतांना लोंबत असलेल्या तारेला अभिचंद च्या हाताचा स्पर्श झाला. स्पर्श होताच हाताला जबर विद्युतचा झटका बसला अन तो खांबावरून खाली पडला. ग्रामस्थांनी निमनी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र वैद्य, यांना घटनेची माहिती दिली. सुरेंद्र वैद्य हे शेतातून तात्काळ आपल्या चारचाकी वाहनाने दरारा येथे आले व अभिचंद ला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वणी ग्रामीण रुग्णालयात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी इतर ठिकाणी उपचार करण्याचा सल्ला दिला. तेव्हा वैद्य यांनी अभिचंद ला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या अभिचंद वर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.  ग्रामस्थांना उजेड देण्याच्या नादात स्वतःच ग्रामपंचायत सदस्य अंधकारात लोटल्या गेला.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top