ब्रेकिंग: फार्मसीचे शिक्षण झालेल्या माधुरी ने घेतली पाटाळा पुलावरून उडी.
वणी:- मारेगाव येथील आईवडिलांचे छत्र हरवलेल्या २८ वर्षीय फार्मसीचे शिक्षण झालेल्या माधुरीने आटोतून उतरून तसेच जवळील साहित्य बाजूला ठेऊन वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरून उडी मारली असल्याची घटना २ ऑगस्ट शुक्रवारी उघडकीस आली आहे. आज शनिवारी शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. Madhuri, who studied pharmacy, jumped from the Patala bridge.Madhuri,
मारेगाव येथील माधुरी अरुण खैरे या तरुणीने फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते. माधुरीचे आईवडील शिक्षक होते. गेल्या १० वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. तर आई उषा यांचा घरातील केरकचरा काढत असतांना अंगावरील कपड्याला आग लागून भाजल्याने मृत्यू झाला होता. घरात दोघेच बहीण ,भाऊ होते.
शुक्रवारी सकाळी माधुरी भावाला वणी येथे कॉलेजच्या कामाला जाते असे सांगून वणीकडे निघाली. आणि वरोरा कडे जाणाऱ्या आटोत बसली. पाटाळा पुलावर आल्यावर तिने आटो चालकाला फोटो काढण्याचे कारण सांगून आटो थांबविला. त्यानंतर आटो चालकाने आटोत बसण्यासाठी बोलाविले परंतु तिने नातेवाईक येणार असल्याचे कारण सांगितले. आटो चालकाला थोडा संशय आला परंतु मुलगी असल्याने तो काही न बोलता वरोरा कडे रवाना झाला.
दुपारचे सुमारास घटना उघडकीस.
दुपारचे सुमारास काही प्रवाशांना पुलावर पर्स, चप्पल, मोबाईल आढळले,दरम्यान माजरी येथील दाम्पत्य फोटो काढण्यासाठी पुलावर थांबले असता पडून असलेल्या मोबाईलवर कॉल आला. तो कॉल माधुरीच्या भावाचा होता. सदर दाम्पत्याने सदर कॉल उचलला व पाटाळा पुलावर काही वस्तू संशयास्पद स्थितीत दिसल्याची माहिती फोनवरून भावाला दिली. भावाने नातेवाईकांना घेऊन तात्काळ पाटाळा पूल गाठले. आणि वस्तु बघितल्या तर त्या माधुरीच्या होत्या.
सीसीटीव्हीत आढळली माधुरी.
नातेवाईकांनी सर्व वस्तू बघून जवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यात माधुरी पुलावरून उडी मारताना स्पष्ट दिसली. या घटनेची तक्रार माधुरीच्या भावाने वणी पोलीस ठाणे गाठून नोंदविली मात्र रात्र झाल्याने शोधमोहीम सुरू केली नव्हती , आज सकाळी शोधमोहीम सुरू करणार असल्याची माहिती आहे. माधुरीने आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे.

.jpg)