विषारी द्रव्य प्राशन करून ईसमाची आत्महत्या.
वणी:- / शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कायर येथील ५८ वर्षीय इसमाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २ ऑगस्ट शुक्रवारी दुपारी ४ ते ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.Eesma commits suicide by consuming poison.
तालुक्यातील कायर येथील शंकर रामभाऊ कावडे या हमाली करणाऱ्या इसमाने शुक्रवारी दुपारी चार ते पाच वाजताचे सुमारास स्वतःच्या घरीच विषारी द्रव्य प्राशन केले. सदरची घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी शंकर ला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली आहे. सध्या शंकरचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात असलेल्या शवगृहात ठेवण्यात आला आहे.
शंकर ला पत्नी,तीन मुली,व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.
मृत्यूचे कारण गुलदस्त्यात आहे.

.jpeg%20poison.jpg)