महिलांसाठी नि:शुल्क स्तन कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन !
वणी :- नागरी सह.पत संस्था महिला काँग्रेस यांचे संयुक्त विद्यमाने तसेच नॅशनल कॅन्सर इन्टीट्यूट नागपूर त्यांचे सहकार्याने महिलांकरिता नि:शुल्क स्तन कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन शेतकरी मंदिर वणी येथे करण्यात आले आहे. Organizing free breast cancer camp for women
वाढत्या प्रदूषण व जीवनातील फेरबदल यामुळे महिला अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. याचाच भाग म्हणजे स्तन कॅन्सर, यात स्तनाला गाठ येणे हा सुद्धा यातीलच एक भाग आहे . यवतमाळ जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष प्रा. टिकारामजी कोंगरे तसेच यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस यांचे संयुक्त विद्यमाने आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या सहकार्याने वणी येथील शेतकरी मंदिर येथे महिलांसाठी नि:शुल्क स्तन कॅन्सर तपासणी शिबीर दि १३ ऑगष्ट मंगळवार ला सकाळी ११ ते ५ वाजताच सुमारास करण्यात येणार आहे. परिसरातील समस्त महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे,काँग्रेसच्या जिल्हा महिलाध्यक्षा संध्या बोबडे, सुरेखा लोंडे , शामाताई तोटावार , माया गाडगे , देवकाबाई येनगंटीवार आदींनी केले आहे.
अधिक माहितीसाठी मेघश्याम तांबेकर ८६६८६४६१६७, प्रमोद वासेकर ९१४६६५६६६४, आशिष मोहितकर ९८२३६६७७७२ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.