संजय देरकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा शिवसेना (उ.बा.ठा ) पक्षात जम्बो प्रवेश
वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात विधानसभा प्रमुख संजय देरकर यांचे मितभाषी नेतृत्व स्वीकारीत अनेक पक्षात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी नुकतेच संजय देरकर यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेबठाकरे ) पक्षात प्रवेश केला आहे. Under the leadership of Sanjay Derkar, Shiv Sena (U.B.Tha) activists made a jumbo entry into the party
यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजय निळकंठराव देरकर यांचे मितभाषी नेतृत्व स्वीकारीत स्थानिक विठ्ठलवाडी येथील कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब पक्षात प्रवेश घेतला यासाठी विनोद ढुमणे,अजिंक्य शेंडे यांची भूमिका महत्वाची होती. तद्वातच वासेकर लेआऊट येथील काँग्रेस पक्षाचे मनसे , बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी संजय देरकर त्यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे .
यातच झारी जामणी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी वणी, झरी तालुक्यात जेष्ठ शिवसैनिकांचा यथोचित सत्कार करत शिवसेनेला बाळ द्यायचे असे आव्हान केले. प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दुर्गम भाग असलेल्या झरी तालुक्यात संपूर्ण वेळ देत शिवसैनिक याना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ,आणि संजय देरकर यांच्या सोबत राहण्याचे आव्हान केले,
प्रसंगी मनसे , काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात संजय देरकर यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. यावेळीजिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, शिवसेना पक्षाचे विधानसभा प्रमुख संजय देरकर , विनोद ढुमणे संतोष भोंगळे, संजय देठे,अजिंक्य शेंडे सह असंख्य शैवसिनिक उपस्थित होते.
विठ्ठलवाडी, सोबतच वासेकर लेआऊट येथील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !
युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांच्या कार्यतत्परता व विधानसभा प्रमुख संजय देरकार यांचं मनमिळावू नेतृत्व यावर भरवसा ठेवत युवक व तरुणांचा कल शिवसेनेकडे असल्याचे बघायला मिळाले . या कार्यक्रमाचे सूत्र संचलन विनोद ढुमणे यांनी केले होते. सोबतच देरकरांना जन माणसातून मिळत असलेली लोकप्रियता अनेकांच्या जिव्हारी लागली असल्याचे समाज माध्यमातून मत व्यक्त होताना दिसते आहे. प्रसंगी विठ्ठलवाडी येथील अभिषेक तामिलवार, संग्राम गेडाम, अश्विन कठोते ,विशाल सरोदे, सूरज पडदेवार ,पराग येसनसुरे , आशुतोष नागभीडकर, हेमंत गावंडे , मनोज वाकटी ,शेख शाबीर शेख अब्बास,सुरज खैरे, प्रतीक गौरकार, सोनू तिराणकर ,सागर गोलाईत ,आकाश तामिलवार ,
तर वासेकर लेआऊट मधील नरेश घुमे,नरेश पाते, आशिष बागडे, शिवा दुर्गे ,नारायण तीरांणकर यांच्यासह असंख्य काँग्रेस, मनसे कार्यकर्त्यांनी मन मिळाऊ नेतृत्व असलेले वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्याव विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला आहे..