विजेचा शॉक लागून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

0


विजेचा शॉक लागून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

वणी:- शिरपूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या पुनवट येथील २१ वर्षीय युवकाच्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.21-year-old youth died due to electric shock
विजेचा शॉक लागून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू



तालुक्यातील पुनवट येथील तुषार शामराव मडावी हा युवक एका खाजगी कंपनीत कामावर होता. सायंकाळी ४ ते ५ वाजताचे सुमारास तुषार आपल्या घरातील कुलर लावत असतांना तुषार ला विजेचा जोरदार धक्का बसला. या विजेच्या धक्क्याने तुषार चा जागीच मृत्यू झाला. ही बाब शेजारच्या लोकांना कळली तेव्हा तुषार मृत अवस्थेत दिसला. घरच्या मंडळींनी शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये जावुन रितसर तक्रार दाखल केली.
     पोलीसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे शुक्रवारी संध्याकाळी दाखल केला.
     शनिवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मॄतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
     तुषार च्या एकाकी जाण्याचे घरच्यांवर दुःखा चा डोंगर कोसळला असुन गावात हळहळ व्यक्त होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top