वंचितच्या विधानसभा अध्यक्षासह सहकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

0


वंचितच्या विधानसभा अध्यक्षासह सहकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.


वणी:- मागील काळात वंचित बहुजन आघाडी पक्षात विधानसभा अध्यक्षपद असलेल्या वणीतील नेत्याने सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.Vanchit's Vidhan Sabha Speaker's colleagues join NCP.
वंचितच्या विधानसभा अध्यक्षासह सहकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.



वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेण्यासाठी डॉ ऍड अंजली साळवे यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार डॉ ऍड साळवे यांनी मुंबई येथे संपर्क केला व यवतमाळ जिल्हा अध्यक्षा वर्षाताई निकम यांना पुर्व कल्पना दिली. त्यावरून २७ सप्टेंबर ला शरदचंद्र पवार साहेबांची तारीख मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी मुंबई, यशवंतराव चौहान सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शशरदचन्द्र पवार साहेबांचे मार्फत प्रदेश सरचिटणीस डॉ ऍड अंजली साळवे यांच्या उपस्थितीत वणी, यवतमाळ येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यानंतर पुन्हा यवतमाळ येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार असल्याचे कळविले.

यात खालील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.)पक्षात प्रवेश घेतला.

1. वंचित बहुजन आघाडी वणी विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष जिल्हा यवतमाळ) - दिलीप भोयर,
2. विधानसभा अध्यक्ष, बळीराजा पार्टी -रामदास पखाले
3. वंचित बहुजन आघाडी वणी, तालुका उपाध्यक्ष - मंगेश गोरे
4. माजी सरपंच, निंबाला, तालुका वणी चंपत पाचभाई 5. सामजिक कार्यकर्ते -अतुल पिदुरकर
6. वंचित बहुजन आघाडी वणी तालुका सह सचिव प्यारेलाल मेश्राम
7. गणराज टेकाम सामाजिक कार्यकर्ते
8. मनोज दुर्गे - शहर उपाध्यक्ष वणी, युवा आघाडी, वंचित बहुजन आघाडी
9. विलास साबापुरे - सामाजिक कार्यकर्ते
10. शरद खुसपुरे - सामाजिक कार्यकर्ता.
    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सूर्यकांत खाडे, मारेगाव तालुका अध्यक्ष भारत मत्ते उपस्थित होते. या नंतर पुन्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, व माजी गृहमंत्रीअनिल देशमुख यांच्या उपस्थितीत बरेच कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top