शहरालगत असलेल्या टेकड्याची व्यापाऱ्याने केली नासधूस?
वणी:- शहरालगत असलेल्या वागदरा गावालगत असलेल्या नैसर्गिक टेकड्याची शहरातील एका व्यापाऱ्याने जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून नासधूस केल्याची घटना उघडकीस आली आहे. महसूल प्रशासनाला माहिती मिळताच येथील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत जेसीबी ताब्यात घेतली आहे.Did the merchant destroy the hill near the city?
वणी शहरालगत असलेल्या वागदरा शिवारात नैसर्गिक खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पुराण काळातील मंदिरे सुद्धा येथे बघायला मिळतात. याच शिवारात शहरातील फर्निचर चा व्यवसाय करणाऱ्या पंकज बन्सीलाल भंडारी या व्यापाऱ्याची जमीन आहे. व अलीकडेच शासकीय नैसर्गिक टेकड्या सुद्धा आहेत. सदर व्यापाऱ्याने शेतात जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने नैसर्गिक टेकड्यावर घाव घालत खोदकाम सुरू केले होते. यातील निघालेला मुरूम स्वतःच्या शेतात सुद्धा नेऊन टाकण्यात आला. एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून शासन स्तरावर अनेक योजना कार्यान्वित आहेत. मात्र सदर योजना निव्वळ कागदावरच असल्याचे बघायला मिळते आहे. राजकीय पाठबळ असल्याचा आधार घेत व्यापारी असलेले शेतमालक नैसर्गिक संपत्तीचा जाणीवपूर्वक ऱ्हास करीत असल्याचे या घटनेवरून निदर्शनास आले आहे. वागदरा गावालगत नैसर्गिक टेकडीवर जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. व खोदकाम केलेल्या टेकडीचा पंचनामा करून लगतच असलेल्या शेतकऱ्यांची विचारपूस केली. यात सहा मीटर रुंद व दोन मीटर खोल असे खोदकाम केले. प्रसंगी सातशे ८० चौरस मीटर मुरुमाचे खोदकाम करून सदर मुरुमाची वाहतूक केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. नैसर्गिक टेकडीची जेसीबीच्या साहाय्याने नासधूस केली ती जेसीबी महसूल विभागाने ताब्यात घेत चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.

.jpg)