नीट ची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या
वणी:- मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या गोंडबुरांडा येथील नीट ची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी ११ सप्टेंबर ला घडली आहे.Suicide of girl preparing for NEET
प्रांजली यशवंत राजुरकर असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.प्रांजली चंद्रपूर येथील वसतीगृहात शिकत होती. प्रांजली ही चंद्रपूर येथील रामनगर जिल्हा क्रीडा संकुलन परिसरात असलेल्या खासगी शिकवणी मध्ये 'नीट' ची तयारी करीत होती, असे समजते. सदर घटना बुधवारी सायंकाळी सात वाजताचे दरम्यान उघडकीस आली आहे. घटनेच्या दिवशी प्रांजली ने अस्वस्थ वाटत असल्याचे कारण सांगून ती शिकवणीला गेली नाही. काही वेळाने मंत्रिणींनी तिच्या खोलीचे दार ठोठावले असता खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मैत्रिणी घाबरून गेल्या होत्या. त्यानंतर वसतिगृह प्रशासनाला माहिती देण्यात आली. दरवाजा उघडला असता प्रांजलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला असता एक चिट्ठी आढळली. त्यात "आईबाबा, मला अभ्यासाचा जास्त ताण असल्याने मी जगाचा निरोप घेते" असे नमूद करीत मला माफ करा असा संदेश चिट्ठीतून दिला होता. या घटनेची माहीती गोंडबुरांडा येथे पोहचताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक प्रांजली हिच्या पाठीमागे आई-वडील व एक लहान भाऊ असा आप्त परिवार आहे. शवविच्छेदना नंतर तिचा म्रुतदेह मुळ गाव असलेल्या गोंडबुराडा येथे आणल्या नंतर येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

.jpg)