शहरात शुभेच्छा फलक लावण्यात पालिकेचा दुटप्पीपणा.

0


शहरात शुभेच्छा फलक लावण्यात पालिकेचा दुटप्पीपणा.



वणी :- शहरात जाहिरातीचे फलक लावण्यासाठी नगर पालिका प्रशासन परवानगी देते. मात्र पालिकेचे अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या फलकांना मुभा तर विरोधी पक्षाचे फलक काढून टाकतात असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी केला आहे.Duplicity of the municipality in putting up greeting boards in the city. 
शहरात शुभेच्छा फलक लावण्यात पालिकेचा दुटप्पीपणा.



वणी शहरात जाहिरातीचे फलक लावण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. यातच आगामी विधानसभा निवडणुका असल्याने विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे जिकडेतिकडे फलक बघायला मिळते आहे. मागील काळात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या वाढदिवसाचे फलक टिळक चौकातील मध्यभागी असलेल्या गोल चक्रावर लावण्यात आले होते. मात्र ते लावलेले फलक मुख्याधिकारी यांनी तात्काळ काढून टाकल्याचे आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी विद्यमान आमदारांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक अद्यापही झळकत आहे. परिणामी नगर पालिकेचे मुख्याधिकारी दुटप्पीपणा करून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जणू पाठबळ देत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे भास्कर गोरे यांनी केला आहे. सदर फलक टिळक चौकातील ओट्यावर अगदी मध्यभागी लावल्याने आता रहदारीच्या ठिकाणी अडथळा निर्माण होत नाही का?असा सवाल देखील उपस्थित केला आहे. याबाबत भास्कर गोरे यांनी मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सदर फलक काढण्याचे सांगितले होते. मात्र दबावाखाली वावरत असल्याने टिळक चौकात मध्यभागी लावण्यात आलेले फलक अद्याप काढले नसल्याने रोष व्यक्त होत आहे. एकूणच शहरात जाहिरातीचे फलक लावण्यासाठी नगर पालिका दुटप्पी धोरण राबवित असल्याचे यावरून दिसते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top