महाविकास आघाडीत तीन लोकांना उमेदवार निवडण्याचे अधिकार.
वणी:- (यवतमाळ) आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडण्याचे अधिकार काँग्रेस,शिवसेना(उ.बा.ठा.) व राष्ट्रवादी(श.प.) पक्षाच्या तीन लोकांना दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांनी वृत्तवाहिन्यांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले आहे.Three people have the right to elect candidates in the Mahavikas Aghadi.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्षाच्या उमेदवारांनी जणू प्रचार मोहीमच राबविणे सुरू केले आहे. सध्यातरी यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, व शिवसेनेचे इच्छुक उमेदवार कंबर कसून तयार आहेत. यातच वरिष्ठांची मर्जी,भेटीगाठी यावर भर देत जणू "गॉड फादर" कडे साकडेच घालतांना दिसते आहे. यातील काँग्रेसचा इच्छुक उमेदवार तर फिक्स आमदार म्हणून मिरवताना दिसतो आहे.
वरिष्ठ पातळीवरून निरीक्षक नेमण्यात आले होते. इच्छुकांच्या मुलाखती देखील झाल्या. यात महाविकास आघाडीची उमेदवारी आमच्याच वाट्याला येणार, अशा वावड्या काँग्रेस,शिवसेनेत उठल्या. इच्छुक उमेदवारांनी मुंबई,दिल्ली वाऱ्या सुद्धा केल्यात. मात्र महाविकास आघाडी वणी ७६ चा उमेदवार कोण? हे सध्यातरी गुलदस्त्यात होते. महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरविणार याची उत्सुकता असतांनाच, काँग्रेसचे उमेदवार निवडण्याचे अधिकार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, शिवसेनेचे (उ.बा.ठा.)उमेदवार निवडण्याचे अधिकार खा. संजय राऊत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडण्याचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना देण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.