-->

शिरपूर पोलिसांनी २४ तासात केले बैलजोडी चोरट्यांना जेरबंद.

0

 शिरपूर पोलिसांनी २४ तासात केले बैलजोडी चोरट्यांना जेरबंद.

वणी:- शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कृष्णानपूर येथील शेतकऱ्याच्या शेतातून बैलजोडी चोरी केल्याची घटना १४ सप्टेंबर ला घडली होती. यासंबंधी शेतकऱ्याने शिरपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच ठाणेदारांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या २४ तासात भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी ताब्यात घेत, चोरीत वापरण्यात आलेल्या वाहनासह तिघांना जेरबंद केले आहे.Shirpur police arrested bullock pair thieves within 24 hours.

शिरपूर पोलिसांनी २४ तासात केले बैलजोडी चोरट्यांना जेरबंद.

     तालुक्यातील कृष्णापुर येथील नामदेव दादाजी लांडे वय ५० या शेतकऱ्याची एक लाख २० हजार रुपये किमतीची बैलजोडी शेतात बांधून असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची तक्रार नामदेव लांडे या शेतकऱ्याने १५ सप्टेंबर ला सकाळी १० वाजता शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.  त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद केला होता. सदर  गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळी  उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश किंन्द्रे व ठाणेदार माधव शिंदे यांनी बिट अंमलदार सह भेट देवुन कृष्णापुर येथील गावक-यांना रात्रीच्या वेळी गावात बाहेर गावाचे लोक आले होते का? याबाबत तपास करतांना काही बाहेर गावचे लोक गावात आले असल्या बाबत माहीती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी संशयीता बाबत तांत्रिक तपास केला असता बैलजोडी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात संशयीत आरोपी भोलाराम सुरेश पडोळे वय 33 वर्षे रा.डोर्ली ता.वणी जि. यवतमाळ याला तात्काळ अटक केली. भोलाराम ची कसून चौकशी केली असता त्याने व ईतर 2 संशयीत आरोपीतांनी बैल जोडी चोरल्याची कबुली दिली.  तसेच सदर बैल जोडी त्याचे पिक अप वाहनाने भंडारा येथे नेल्याची कबुली दिली. त्यावरुन शिरपूर ठाणेदार माधव शिंदे यांनी रातोरात भंडारा येथे पोलीस पथक पाठवुन चोरी गेलेली बैलजोडी हस्तगत केली. यात चोरी गेलेली एक लाख २० हजार रुपये किमतीची चोरी गेलेली बैलजोडी व  तीन लाख रुपये किमतीचे पिक अप वाहन असा एकूण चार लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अवघ्या २४ तासात हस्तगत करीत तिघांना जेरबंद केले आहे.  यातील अटक करण्यात आलेला आरोपी व ईतर संशयित आरोपी विरुध्द पुढील तपास सुरु आहे.

     सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंन्द्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे शिरपुर येथील सपोनि माधव शिंदे ठाणेदार शिरपुर पोउपनि. रावसाहेब बुधवत,  गंगाधर घोडाम  गजानन सावसाकडे चालक विजय फुल्लुके यांनी पार पाडली आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top