वेकोली कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा..
वणी:-. वेकोलीच्या वणी एरियात येणाऱ्या नायगाव कोळसा खाणीतील विश्राम खोलीत जेवणाचा डबा,व कपडे बदलण्याची बेलोरा येथील दोन कामगार गेले असता.खोलीत त्यांना एक बॅग ठेऊन दिसली. त्यात असलेले ४० हजार रुपये आढळले असता सोबत असलेल्या कामगारांना सर्व रक्कम दाखवून तरोडा येथील कामगाराच्या पत्नीकडे सोपवून आपला प्रामाणिकपणा दाखविल्याची घटना १६ ऑक्टोबर ला दुपारी तीन वाजता उघडकीस आली आहे. Such sincerity of Vekoli employees
तालुक्यातील बेलोरा येथील दिवाकर भोंगळे,अनिल रेगुंडवार वेकोलीच्या नायगाव कोळसा खाणीत काम करणारे दोघेही कामावर रुजू होण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी असलेल्या बैठक खोलीत नेहमीप्रमाणे दुपारी तीन वाजता सोबत आणलेला जेवणाचा डबा ठेऊन कामावरील कपडे अंगावर चढविण्यासाठी गेले असता. त्याच खोलीत एक बॅग ठेऊन दिसली.
सदर बॅग कोणाची आहे व त्यात काय साहित्य आहे. हे तपासण्यासाठी बेलोरा येथील वेकोली कामगार दिवाकर भोंगळे, व अनिल रेगुंडवार यांनी बॅग उघडली असता. त्या बॅग मध्ये जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, व एका कप्प्यात ४० हजार रुपये रोख रक्कम आढळली. तेव्हा तेथेच असलेल्या योगेश इंगोले, श्रीराम राडे या वेकोली कामगारांना जवळ बोलावून सदर बॅगेमध्ये ४० हजार रुपये असल्याचे दाखविले. व सदर बॅग कोणाची आहे. याबाबत सविस्तर चौकशी केली असता तरोडा येथील श्रीराम वैद्य या कामगाराची असल्याचे निदर्शनास आले.
बॅग मधील पैसे दिवाकर भोंगळे याांनी स्वतःजवळ ठेऊन घेतले मात्र सदर कामगाराने याबाबत कोणतीही चौकशी केली नाही. त्यानंतर भोंगळे व रेगुंडवार हे कामावर निघून गेले. लागलीच दुसऱ्या दिवशी तरोडा येथील श्रीराम वैद्य यांचे घर गाठून सदर रक्कम श्रीराम यांच्या पत्नी जवळ सोपवली. प्रसंगी विनोद मांदाडे, अशोक पानपट्टे, यांच्या समक्ष तरोडा येथे जाऊन देत या वेकोली कामगारांनी प्रामाणिकपणा दाखविला.