सलग दोन दिवसांत दोन आत्महत्या.

0


सलग दोन दिवसांत दोन आत्महत्या.


वणी:- उपविभागातील शिरपूर, मुकुटंबन पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या धूनकी,व बोपापुर येथील दोन इसमांनी सलग दोन दिवसांत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोबतच 3 सप्टेंबर ला ढाकोरी येथील युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. Two suicides in two consecutive days. 
सलग दोन दिवसांत दोन आत्महत्या.



शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धूनकी येथील शंकर अनंतराव मेश्राम या ५० वर्षीय इसमाने ४ सप्टेंबर ला रात्री घरची मंडळी झोपली असतांना स्वतःच्या घराच्या अंगणात विषारी द्रव्य प्राशन केले. दुसऱ्या दिवशी घरातील मंडळी सकाळी उठल्यावर शंकर अंगणात मृतावस्थेत दिसला. या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना दिली. आणि पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली असता,पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून शंकरचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सदर घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

बोपापुर येथील सुनील ने केली आत्महत्या.


मुकुटंबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोपापुर येथील सुनील शत्रुघ्न पेंदोर या ४० वर्षीय शेतकऱ्याने ५ ऑक्टोबर शनिवारी सकाळी शेतात नेऊन विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली. या घटनेची माहिती सुनील च्या भावाने मुकुटंबन पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून सुनील चा मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आल्याची घटना घडली आहे. पुढील तपास मुकुटंबन पोलीस करीत आहे. सलग दोन दिवसात दोन आत्महत्या झाल्या मात्र आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. वणी उपविभागात आत्महत्येचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे या घटनेवरून दिसून येते आहे.

शेतकरी आत्महत्या करण्याचे कारण काय?

    यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्या जिल्हा म्हणून ओळखल्या जातोय. मात्र ज्यावेळी घटनेचा पंचनामा करण्यात येतोय,अगदी तेव्हाच अनेक त्रुटी येत असल्याने शेतकऱ्यांनाच्या कुटुंबियांना शासनाची मदत होत नसल्याचे अनेक ग्रामस्थ आपले मत बोलतांना व्यक्त करतात? हीच खरी शोकांतिका आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top