एसपींच्या आदेशांतरही पोलीस अधिकारी जुन्याच ठिकाणी.

0

 एसपींच्या आदेशांतरही पोलीस अधिकारी जुन्याच ठिकाणी.

वणी:-  जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊनही काही मर्जीतील अधिकारी जुन्याच ठिकाणी ठिय्या मांडून बसले आहे. अगदी निवडणुकीच्या तोंडावर बदली झालेल्या कर्मचारी, व अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी देऊन सुद्धा अद्याप अधिकारी कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे दिसते आहे. यातच वणी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक यांची नियंत्रण कक्षात बदली होऊन देखील त्यांना अद्याप कार्यमुक्त केले नसल्याचे समजते. The police officers are still in the old place even after the order of the SP.

एसपींच्या आदेशांतरही पोलीस अधिकारी जुन्याच ठिकाणी.

     

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी १३ ऑक्टोबर ला बदली झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ कार्यमुक्त करून बदली झालेल्या ठिकाणी रवाना करण्याचे आदेश दिले होते. यात वणी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याला ठाणेदारांनी अद्यापही कार्यमुक्त केले नाही. सदर पोलीस उपनिरीक्षकाची वणी येथून नियंत्रण कशात बदली झाली आहे. मात्र जणू वणी ठाण्याचा त्यांना मोह आवरत नाही की, काय? की वरिष्ठ कार्यालयाचे छुपे पाठबळ तर नसेल ना? असा प्रश्न उपस्थित होते आहे.

     विशेष म्हणजे, सदर पोलीस अधिकारी याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यातही अडकल्याचे समजते. त्यांच्या तुकडीत असलेल्या सर्व पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. तुकडीतील सर्व पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक झाले आहेत. सोबतच जिल्हा वाहतूक उपशाखा येथे कार्यरत असलेले अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून वणीतच ठिय्या मांडून आहे. यातच गेल्या कित्येक वर्षांपासून वणी ठाणे,वणी उपविभाग, वाहतूक शाखा असे चक्र चालविणारे बरेच पोलीस कर्मचारी येथे ठिय्या मांडून आहेत. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलेले आदेश मात्र पायदळी तुडविले जात असल्याचे स्पष्ट होते आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top