विजेचा धक्का लागून शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल..
वणी : तालुक्यातील नेरड येथील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा तारेच्या कुंपणाला लावलेल्या विद्युत प्रवाहाचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना ११ ल घडली होती. या घटनेची तक्रार मृतकाच्या मुलाने मुकुटंबन पोलिसांत दिल्यावरून शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.A-case-has-been-registered-in-the-case-of-the-death-of-a-farmer-due-to-electric-shock.
मुकूटबन पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नेरड येथील विठ्ठल आनंदराव जुनगरी ,वय ५१, रा. नेरड या शेतकऱ्याचा तार कुंपणाला लावलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झाला होता. मृतक विठ्ठल जुनगरी हे ११ ऑक्टोंबर शुक्रवारी दुपारी आपल्या बैलांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेला होता. सायंकाळी अंधार पडूनही तो घरी परतला नाही. त्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी शेतात जाऊन पाहिले असता, विठ्ठल जुनगरी याचा तारेच्या कुंपणावर मृतदेह पडलेला दिसला.
जमिनीवर टाकलेल्या किंवा तार कुंपना मध्ये लावलेल्या जिवंत विद्युत तारांमुळे जीवितहानी होऊ शकते, असे माहीत असताना शेतमालक अनिल नानाजी कुचनकार, ५० रा. नेरड यांनी शेताच्या तार कुंपना मध्ये वीज प्रवाहित केली. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूस अनिल कुचनकार कारणीभूत असल्याची फिर्याद मृतक विठ्ठल जूनघरी यांचा मुलगा अजित विठ्ठल जूनघरी यांनी शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून मुकूटबन पोलिसांनी या मृत्यू प्रकरणी शेतमालक अनिल नानाजी कुचनकार विरूध्द मुकूटबन पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा भारतीय न्याय संहिता कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.