संविधान दिनानिमित्त आ. संजय देरकर चैत्यभूमीवर नतमस्तक! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!
वणी :- २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन असल्याने वणी विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी चैत्यभूमी मुंबई येथे जावून भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. संविधानाच्या दिनाचे महत्त्व समजून वणीतील आमदारकीच्या इतिहासामधील चैत्यभूमीवर जाणारे संजय देरकर हे पहीले आमदार ठरले अशी चर्चा मतदार संघातील संविधानप्रेमी जनतेत सुरू झाली आहे. On-the-occasion-of-Constitution-Day,-Mr.-Sanjay-Dekar-bowed-at-Chaityabhoomi!
मागील दोन दिवसापासून वणीचे लोकप्रिय आमदार संजय देरकर हे मुंबई येथे पक्ष आदेशाने गेले आहे. आमदारांनी मुबई येथे जाताच हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देवून त्यांना अभिवादन केले. त्याच बरोबर मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वंदनीय बाळासाहेबांना वंदन कडून मंगळवारी चैत्यभूमी येथे जाऊन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक झाले.
मुंबई येथील २६/११ च्या आतंकवादी हल्यातील शहीद झालेल्या स्मृती स्थळाला देखील आ. संजय देरकर यांनी भेट देवून सर्व शहिदांना मानवंदना अर्पण केली आहे. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून चैत्यभूमीवर जावून भारतीय संविधानाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारे आमदार संजय देरकर हे पहिले आमदार ठरले आहे.
तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केल्याने वणी विधानसभेतील संविधानप्रेमी व शिवप्रेमी जनतेमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, दीपक कोकास, डॉ. विवेक गोफने, सुधीर थेरे, शरद ठाकरे, आदी उपस्थित होते.