जनसामान्यांची मेहनत फळाला आलीय!

0


जनसामान्यांची मेहनत फळाला आलीय!


आ. संजय देरकर

वणी:- मागील २५ वर्षे माझ्या वणी विधानसभेतील सामान्य माणूस,शेतकरी, शेतमजूर आणि इतरांनी जो संघर्ष करून यावेळी निवडून दिले त्यांचे मनःपूर्वक आभार मानून आपल्या मेहनतीला फळ आले,आणि त्याला तडा जाऊ देणार नाही . सोबतच जनसामान्यांचे प्रश्न,शेतकरी,शेतमजूर आणि सामान्य जनता यासाठी मी सदैव तत्पर असणार ही माझी ग्वाही आहे. असे उद्गार नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी काढले आहे.The-hard-work-of-the-people-has-paid-off!
जनसामान्यांची मेहनत फळाला आलीय!



वणी विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी जनसामान्यांच्या मदतीने भाजपाचे गेली दहा वर्षे सत्तेत असणारे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा दारुण पराभव केला. एकीकडे धनशक्ती,सोबतच सत्ताधारी आमदार यांना जबरदस्त आव्हान देत सामान्य जनतेच्या प्रेमावर ही निवडणूक मताधिक्याने जिंकली. एकीकडे पैसा, प्रशासन हाताशी धरून, अनेक घडामोडी केल्या खऱ्या. मात्र त्या सपशेल फेल ठरवीत जनतेने संजय देरकर यांचा मितभाषी स्वभाव व गेल्या २५ वर्षाचा संघर्ष याला दाद देत वणी विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून स्वीकारले. येत्या काळात सरकार कोणाचेही येवो पण जनतेच्या सेवेस कायम राहील. असे उद्गार त्यांनी काढले. परिणामी या विजयाने प्रस्थापित माजी आमदार ढसाढसा रडले हे ही खरे! पराभव तर चार दा झाला असतांना संजय देरकर कधी रडले नाही. ते लढत राहिले हे विशेष! यावरून माजी आमदार जनतेचे होते की,स्वताच चांगभलं करणारे होते यावरून स्पष्ट होतेय!

यात कोणताही उहापोह न करता महाविकास आघाडीचे नेते, या शिवसेना(उबाठा) ,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, इतर घटक पक्ष यांनीही कंबर कसली. अन जनतेला काय हवं त्यासाठी नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांना विधानसभेत प्रतिनिधी म्हणून पाठवले.

मितभाषी आमदार मिळाला वणीला!


खर तर मितभाषी नेता! कोणालाही न दुखावता काम करणारा नेता म्हणून ख्याती आहे. त्यांनी अनेकांना मोठमोठ्या पदावर बसविले. मात्र ज्यांना दिले तेच फितूर झाले असे चित्रही बघायला मिळाले.

मात्र त्यांचे जुने शिलेदार कोणतीही अपेक्षा न ठेवता कामाला भिडले अन विजय खेचून आणला हे त्रिवार सत्य आहे.

वारकरी संप्रदाय!


पिढ्यान्पिढ्या वारकरी संप्रदायात असलेले देरकर कुटुंब, परिसरात सद्गुरू जगन्नाथ महाराज देवस्थान स्वखर्चाने सांभाळणारे कुटुंब,आणि भाविकांचे त्यांच्यावरील असलेले प्रेम. याच बळावर जन्मानसाच्या हृदयात सामावलेले वारकरी संप्रदायाचे प्रतीक देरकर कुटुंब! यातूनच जनतेची सेवा करण्याचे बळ त्यांच्या अंगीकृत झाले.


कायम जनतेच्या सेवेत असणार!


मला वणी विधानसभा मतदारसंघातील जनतेने भरभरून प्रेम करीत यश दिले,त्यांचा सदैव ऋणी असेल. मोह माया यात न पडता सामान्य जनता, शेतकरी,शेतमजूर,आणि सर्व यांच्या सेवेशी तत्पर राहील.

नवनिर्वाचित आमदार

संजय देरकर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top