युवतीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी
वणी:- मारेगाव पोलीस ठाण्याच्या च्या हद्दीत येत असलेल्या जानकाई पोड येथे एकाने विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार शुक्रवारी पोलीसात दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला तात्काळ अटक केली असता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. Accused-in-molestation-case-of-young-woman-sent-to-district-jail
मारेगाव तालुक्यातील जाणकाई पोड येथील पिडीत मुलगी वडील, बहीण,वडील यांच्या सोबत वास्तव्याने आहे.पिडीताचे घराचे बांधकाम सुरु असल्याने बाजुलाच टिनाचे शेड मध्ये वास्तव्य करीत आहे. घटनेच्या वेळी पिडीत आजी आणि बहीणी सोबत असतांना संशयीतांची वाईट नजर पिडीतेच्या दिशेने गेली. रात्री अकरा वाजताचे सुमारास विज गुल झाल्याचा फायदा उचलत यशवंत आत्राम 23 हा तरुण पीडिता वास्तव्यास होती तिथे पोहचला असतांना अचानक विज आली. परिणामी सर्व प्रकार पिडीते सह सर्वाच्या लक्षात येताच घटनास्थळा वरुन संशयीत धुम ठोकुन पळाला. पिडीतेच्या ओरडण्याचा आवाज ऐकुण वडीलही घटनास्थळी पोहचले घटनेची तक्रार मारेगाव पोलीसात केली असता यशवंत विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखुन संशीयीतातास तात्काळ ताब्यात घेण्यात आले होते. मारेगावच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.