माझ्या शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर! आ.संजय देरकर
वणी:- गेल्या दहावर्षापासून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जातांना ज्या यातना झाल्याय! पांदण रस्ते अद्याप पूर्ण झालेत नाही. अशा माझ्या गावखेड्यातील शेतकऱ्यांनी जर पांदण रस्त्याचे प्रस्ताव सादर केले नसेल त्यांनी सामूहिक पणे प्रस्ताव सादर करावे , जेणेकरून चिखलात बैल,अन मजूर यातना भोगताहेहेत त्यांच्यासाठी पांदण रस्ते अग्रक्रम असणार. संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन आमदार संजय देरकर यांनी केले आहे.Always-ready-for-my-farmers!-M.L.A.-Sanjay-Dekar
गेल्या अनेक वर्षांपासून वणी विधानसभेतील शेतकरी,तथा शेतमजूर शेतात राबण्यासाठी भर चिखलातून ये-जा करीत आहे. त्यांच्या यातना आजपर्यंत कोणालाही कळल्या नाहीत. बियाणे टोबनी पासून तर काढण्यापर्यत त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यासाठीच शासनाच्या पांदण रस्ते सबलीकरण या योजनेचे तीनतेरा वाजल्याने आमच्या कास्तकारांना अनेक आव्हानांना समोर जावे लागले. यासाठीच आता वणी विधानसभेतील शेतकऱ्यांनी संबंधित गटविकास अधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करावा. व पांदण रस्ते स्वतःहून लक्ष घालून करून घ्यावे. जेथे गरज भासेल त्याठिकाणी व आपल्या सेवेस सदैव तत्पर राहील. असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार यांनी एका वृत्तवाहिणीच्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.