युवकावर प्राणघातक हल्ला. 'प्रणय'ची प्रकृती चिंताजनक !

0


युवकावर प्राणघातक हल्ला. 'प्रणय'ची प्रकृती चिंताजनक !

वणी :-

दिवसागणिक युवकांवर भाईगिरीचे व प्रेमप्रकरणातून विपरीत परिणाम होत आहे. माळीपुरा येथील एका युवकावर दोघांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर 5 केल्याची घटना दि ०१ ला सकाळी ९ वाजताच्या दरम्यान उघडकीस • आली.Fatal-attack-on-youth.-'Pranay''s-condition-is-critical!
युवकावर प्राणघातक हल्ला. 'प्रणय'ची प्रकृती चिंताजनक !

      प्रणय मुकुंद मुने (अं २१) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नांव आहे. प्राप्त महितीनुसार, प्रणय हा त्याच्या आईसह घरसंसार सेल जवळील परिसरात वास्तव्यास आहे. तो एका शोरूममध्ये काम करतो. दि १ डिसेंबर २०२४ ला सकाळी ९ वाजताच्या दरम्यान प्रणय घरी एकटा असताना, दोघे जण प्रणवच्या घरी आले. दरम्यान त्यांची काही चर्चा झाली. त्यानंतर आतमध्ये काय रंगले की अचानक आलेल्या युवकांनी प्रणयवर प्राणघातक ब्लेडने हल्ला चढविला. घराशेजारील असलेल्या काकूने अचानक प्रणयची अवस्था बघितली प्रणय रक्ताने झांवर पडलेला दिसला. त्याच्या शेजारी दोघे तरुण होते, प्रणयच्या काकू लगेच घराच्या बाहेर आल्या व त्यांनी दरवाजा बाहेरून बंद केला. त्यामुळे हल्लेखोर आत अडकले. याची माहिती शेजा-यांना मिळताच त्यांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले व प्रणयला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

हल्ला होताच ही घटना वा-यासारखी वणी शहरात पसरली. यामुळे एकच खळबळ उडाली. लोकांनी माळीपुरा व ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती. हल्लेखोर वणीत का आले होते?. त्यांनी प्रणयवर हल्ला का केला? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. सध्या प्रणय याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.


दोन आरोपी हिंगणघाट येथून जेरबंद



• दरम्यान याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपीं नामे अजिंक्य चौधरी (25), व एक विधिसंघर्ष ग्रस्त बालकाचा समावेश आहे. दोघेही रा. हिंगणघाट, जि वर्धा यांना ताब्यात घेतले. असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top