बीएसएनएल ने ग्राहकांना दिलीय,नवीन वर्षाची भेट. इतक्या किमतीत दररोज 2 जीबी डेटा. शेवटची तारीख कोणती?

0

 बीएसएनएल ने ग्राहकांना दिलीय,नवीन वर्षाची भेट. इतक्या किमतीत दररोज 2 जीबी डेटा. शेवटची तारीख कोणती?

वणी;-  भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून बीएसएनएल सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज च्या किमतीत वाढ केल्यानंतर ग्राहकांनी आपला मोर्चा बीएसएनएल कडे वळविल्याचे बघायला मिळते आहे. BSNL-has-given-a-New-Year-gift-to-its-customers.-2-GB-data-per-day-at-this-price.-What-is-the-last-date?

बीएसएनएल ने ग्राहकांना दिलीय,नवीन वर्षाची भेट. इतक्या किमतीत दररोज 2 जीबी डेटा. शेवटची तारीख कोणती?

     BSNL Recharge plan:

त्यानंतर अनेकांनी आपले नंबर बीएसएनएल मध्ये सुद्धा पोर्ट केले आहे.  बीएसएनएल ने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर लॉन्च केली आहे.  नवीन वर्षाच्या सुरवातीला बीएसएनएल ने कोणती ऑफर आणली ती जाणून घेऊया.

    बीएसएनएल ने फेस्टिव्ह सिझन ऑफर आणली आहे.  ज्यामध्ये बीएसएनएल ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.  या प्लॅनची किंमत २७७/- रुपये आहे. तर बघूया या प्लान मध्ये काय आहे विशेष!

     बीएसएनएल चा २७७/- चा प्रीपेड प्लान

बीएसएनएल च्या २७७ रुपयांच्या प्लान ची वैधता  ६० दिवसांची आहे.  ६० दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्सना दररोज २ जीबी डेटाचा फायदा मिळणार आहे.  डेटा लिमिट संपल्यावर युजर्स 40  kbps च्या स्पीडवर अनलिमिटेड डेटा चा फायदा घेऊ शकतात.  

या तारखेपर्यंत आहे ऑफर.

बीएसएनएल च्या २७७ रुपयांच्या रिचार्ज प्लान चा फायदा १६ जानेवारी पर्यंत घेऊ शकता. म्हणजेच हा प्लान ग्राहकांना १६ जानेवारी पूर्वी खरेदी करावा लागेल. सदर माहिती बीएसएनएल ने सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरील  एक्स च्या माध्यमातून दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top