आमदारांचा झंझावात अन, जनसामान्यांच्या समस्या?

0


आमदारांचा झंझावात अन, जनसामान्यांच्या समस्या?


वणी(रवी ढुमणे)

:- वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी शेतकरी,कष्टकरी जनतेच्या समस्या ,शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते, आणि जे कणात बीज रोवले त्याचा योग्य मोबदला मिळावा आणि शेतकरी कष्टकरी जनतेशी चर्चा व्हावी हाच उद्देश ठेऊन, आमदार संजय देरकर यांनी वणी विधानसभा मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. यात शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्य,शिक्षण यावर प्रामुख्याने भर देण्यात असल्याचे आमदार संजय देरकर एका लोकाभिमुख कार्यक्रमात बोलले आहेत. 
The-storm-of-MLAs,-the-problems-of-the-common-people? 
आमदारांचा झंझावात अन, जनसामान्यांच्या समस्या?


वणी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून महायुती सरकारचे वर्चस्व होते. यातच, दोन वर्षे महाविकास आघाडीला मिळाले. महाविकास आघाडीने नागपूर अधिवेशनात सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. शेतकरी सुखी तर जग सुखी हा संदेश घेत आमदार संजय देरकर हे मैदानात उतरले खरे, मात्र माजी दोन आमदार मागून वार करण्यात सज्ज झालेत. या भिकेला न जुमानता आमदारांनी बळीराजा,सामान्य जनता यांच्या सोबत कायम एकनिष्ठ राहण्याचे आवाहन पेलत ते जनमानसात उतरले. सद्यस्थितीत वेकोली हा माजी आमदारांचा गड आहे. येथे त्यांचे पंटर जनतेची दिशाभूल करीत आपलेच सरकार असतांना आंदोलने करीत आहेत. खरच यात जे आहेत, त्यांना जर खरच आपल्याविषयी कळवळा असता तर, गरज काय?आंदोलनची?

गेली दहा वर्षे सत्ता उपभोगली, आणि ह्यो नेता, दोन लगतच्या तालुक्यातील जनता, अन माझी भाकरी शिजली अस तर नाही ना?

गेली दहा वर्षे केंद्रात सत्ता असतांना रस्त्याची दुरवस्था का? निधी नव्हता की, माजी आमदार सपशेल फेल? केवळ प्रश्नच आहे.

स्वताच उखळ पांढरे करण्यासाठी घोंगळ्यातले तयार झाले असेच म्हणावे लागेल. आता गेली दहा वर्षे निवेदने,आंदोलने करणारा माजी जिल्हा परिषद सदस्य, अन चड्डीधारी नेता, शेतकऱयांना पुढे करीत आपली भाकरी शेकतोय! खरच कळवळा आहे का? या माजी जिल्हा परिषद सदस्याला? असता तर? मुख्यमंत्री यांच्या पक्षाचे, मग अडवलं कोणी,? हाच खरा प्रश्न आहे.

जर जनसामान्यांची धग असती तर निधी खेचून आणला असता. केवळ स्वतःची भाकरी भाजविणारा नेता गेली दोन वर्षे त्यांच्या पक्षाची सत्ता असताना आंदोलने व निवेदन देतोय कशासाठी? जनता पागल नाहीत.

सत्ता यांची आजही गावागावात पांदण रस्ते झाले नाहीत. लाडकी बहीण मध्ये आणून महिलांची दिशाभूल, शेतकरी कष्टकरी जनतेला गाजर अन ह्यो ??? बेरोजगार फक्त यांच्या पक्षात असल्याचे वावरतोय! मग गेली १० वर्षे घर भरलं की काय? आजच कसा उमाळा आलाय. माजी जिल्हा परिषद सदस्य सत्ता असून निवेदने देतोय,आंदोलन करतोय. म्हणजे जनता मूर्ख असाच समज तर नसेल ना?

गरज काय आंदोलनाची? ...असेल हिम्मत तर,सरकार यांचं आहे. निधी खेचून आणायला हवा. पण किती नौटंकी... ?

दिशाभूल बंद करा.सैविधानिक मार्गाने चला, तो दिवस दूर नाही ही जन्मानसाची प्रतिक्रिया..

जनतेसाठी कायम सोबत!


यापुढे कोणीही कितीही राजकारण केले तरी, मी माझ्या शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी,अन सामान्य जनतेसाठी कायम सोबत!

गेली २५ वर्षे संघर्ष करून मला जनतेनी आशीर्वाद दिलाय! त्यांचे प्रथम आभार!

आज मी आपलाच आहे. आपल्या सोबकायम राहील ही ग्वाही! अन जरी विरोधी पक्षात असलो तरी भेदभाव करणार नाही. शेवटी मी आपलाच एक आहे.

आमदार:- संजय देरकर

वणी विधानसभा।मतदार संघ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top