वणी वकील संघाच्या निवडणुकीत एकता पॅनल चा विजय.

0

 वणी वकील संघाच्या निवडणुकीत एकता पॅनल चा विजय.


वणी :-  वणी बार  असोसिएशन ( वणी वकील संघ ) ची २०२५-२६ या पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी २५ जानेवारीला झालेल्या निवडणुकीत एकता पॅनल व विकास पॅनल मध्ये झालेल्या चुरशीचा लढाईत ॲड. वीरेंद्र महाजन यांच्या एकता पॅनल चे ७ तर ॲड. निलेश चौधरी यांचा विकास पॅनल चे ४ सभासद निवडून आले. १०५ अंतिम मतदार यादीतील १०२ वकिलांनी मतदानात भाग घेऊन आपल्या मताचा कौल दिला.  निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. शाम गायकवाड यांनी निवडणुक प्रक्रिया योग्य पद्धतीने सांभाळून पारदर्शकपणे निवडणूक निकालाची सायंकाळी ७ वाजता घोषणा केली. Ekta-Panel-wins-in-the-Wani-Lawyers-Association-elections. 

वणी वकील संघाच्या निवडणुकीत एकता पॅनल चा विजय.

      वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिलांचे अनेक प्रश्न असल्याने या निवडणुकीत त्याला वाचा फोडण्याचे महत्त्वाचे कार्य झाले. दोन्ही पॅनल नी आपल्या घोषणा पत्रकात अनेक महत्त्वाचे मुद्दे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या निवडणुकीत ॲड. वीरेंद्र महाजन यांच्या एकता पॅनल ने बाजी मारत अध्यक्ष पद ॲड. वीरेंद्र महाजन, उपाध्यक्ष पद ॲड. यशवंत बरडे, सचिव पद ॲड. अमोल टोंगे, सहसचिव पद ॲड. रामेश्वर लोणारे आणि तीन सदस्य पदे ॲड. दिलीप परचाके, ॲड. चंदू भगत व ॲड. आकाश निखाडे अशी ७ पदे खेचून घेतली तर ॲड. निलेश चौधरी यांच्या पॅनल ने कोषाध्यक्ष पद ॲड. प्रेम धगडी व सदस्य पदे ॲड. दुष्यंत बोरुले, ॲड. अविनाश बोधाने व ॲड. प्रतीक्षा शेंडे अशा ४ पदावर समाधान मानावे लागले. स्वतः ॲड. निलेश चौधरीला अध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. एकता व विकास पॅनल मध्ये विकास पॅनल चा पराभव तर एकता पॅनल चा विजय झाला. 

     वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकीलांसाठी बसण्यासाठी जागा, महिला वकिलांसाठी विशेष बार रूम, नवीन दिवाणी न्यायधीस वरिष्ठ स्तर व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत उभी करणे, परीक्षा देणाऱ्या वकीलांसाठी प्रशिक्षण शिबिर घेणे, ई विधी ग्रंथालय उभारणे, तिन्ही भाषेतील वृत्तपत्रे सुरू करणे, अत्याधुनिक कॅन्टीन, वकिलांचा वाहनांसाठी पार्किंग, महसूल कार्यालयात वकिलांना येणाऱ्या अडचणी दूर करणे, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू करणे, आदी व अन्य प्रश्नाची सोडवणूक करण्याचे आश्वासन दोन्ही पॅनल ने केली होती. ती या निवडणुकीनंतर पूर्ण करण्याचा दबाव या नवीन कमिटी ला राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top