पालकमंत्र्यांनी घेतली इंदिरा बोंदरे यांच्या आत्मदहन आंदोलनाची दखल.
झरी जामणी : पालकमंत्री संजय राठोड यांनी झरी जामणी तालुक्यातील इंदिरा बोंदरे यांच्या आत्मदहन आंदोलनाची घेतली दखल घेतल्यामुळे प्रजासत्ताक दिनी होणारा अनर्थ टळला असल्याचे मनोगत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले.The-Guardian-Minister-took-note-of-Indira-Bondare's-self-immolation-movement.
शामादादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा इंदिरा बोंदरे यांनी आदिवासी के तिन कप्तान गोंड कोलाम ऑर प्रधान असा नारा देवून 26 जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोलाम समाजातील सर्व संघटना एकत्र येवून शासन प्रशासन दरबारी निष्ठेने पाठपुरावा केल्यामुळे इंदिरा बोंदरे यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतल्यामुळे संपूर्ण कोलाम समाज एकजुटीने एकत्र आल्याची चर्चा जिल्ह्यातील विचारवंत करत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोलाम समाजाचे युवा सामाजिक कार्यकर्ते अतुल आत्राम यांनी पांढरकवडा येथून आंदोलनाचे समर्थन करुन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. तर यवतमाळ मधून शामादादा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेश गाडेकर यांनी विशेष पुढाकार घेवुन बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेवुन इंदिरा बोंदरे यांच्या निवेदनातील मागण्या व कोलाम समाजाच्या इतरही मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली. त्यावर शामादादा कोलम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुमरे यांनी इंदिरा बोंदरे यांच्या मागण्याबाबत जिल्ह्यात प्रशासकीय बैठक आयोजित करण्याचा आग्रह केल्यामुळे व इंदिरा बोंदरे यांनी आपली भूमिका आक्रमकपणे लावून धरल्यामुळे अखेर पालकमंत्री संजय राठोड यांनी 30 तारखेला प्रशासकीय बैठकीचे आयोजन करून 26 जानेवारी रोजी इंदिरा बोंदरे यांच्या आत्मदहनाचा अनर्थ पालक मंत्री संजय राठोड कोलाम समाजाच्या एकजुटिमुळे टळला असल्याचे मत भाई जगदीश कुमार इंगळे यांनी व्यक्त केले. यावेळी कोलाम समाजाचे युवा नेते लक्ष्मण आसोले यांनी कोलाम समाजाच्या विविध संघटनेने 30 तारखेला आपल्या आपल्या गावातील समस्या घेवुन उपस्थीत राहण्याचे आव्हान केले असून कोलाम समाजाची प्रथमच पालकमंत्र्याच्या सोबत शामादादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा इंदिरा बोंदरे यांना घेऊन प्रशासकीय बैठक होत असल्यामुळें कोलाम समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.